आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बर्गरमध्ये निघाला काचेचा तुकडा, घास घेताच रक्ताने भरले तरूणाचे तोंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यामधील एक मोठी बर्गर चेन "बर्गर किंग"च्या आउटलेटमध्ये एका तरूणाला बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळला. त्या तरूणाने जेव्हा बर्गरचा एक घास खाल्ला, तेव्हा त्याचे तोंड रक्ताने भरले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले.

 

मेडिकल रिपोर्टनंतर होईल कारवाई
याप्रकरणी पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनचे इंस्पेक्टर दीपक लागड यांनी सांगितले की, "आम्ही ग्राहकाच्या तक्रारीवरून शनिवारी(18 मे) ला बर्गर किंगविरूद्ध लिखीत तक्रार दाखल केली आहे. आम्ही हॉस्पीटलच्या मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहोत. रिपोर्ट आल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू."


गळ्यात अडकला काचेचा तुकडा
तक्रारदार साजित पठान(31) ऑटो रिक्शा ड्रायव्हर आहे. तो आपल्या मित्रांसोबत बुधवारी(15 मे)जेवण करण्यासाठी बर्गर किंगच्या आउटलेटवर गेला होता. त्याने बर्गर, फ्राइज आणि सॉफ्ट ड्रिंक ऑर्डर केले. त्यानंतर त्याने बर्गर खाताच काचेचा तुकडा त्याच्या गळ्यात अडकला आणि तोंड रक्ताने भरले. 


फूड आउटलेटने घटना झाली नसल्याचे सांगितले 
जखमी अवस्थेत तरूणाला रूग्णालयात भर्ती केले गेले. उपचारासाठी त्याला 15 हजार रूपये भरावे लागले, तसेच दुसऱ्या दिवशी त्याला दुप्पट पैसे भरावे लागले. बर्गर किंगचे मॅनेजर सिद्धार्थला याबाबत विचारले असता, त्यांनी अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...