आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पिफ’ रंगणार ९ ते १६ जानेवारीदरम्यान , ‘राज्याचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही यंदाच्या महोत्सवाची थीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समारोप सोहळा यंदा एफटीआयआय प्रांगणात रंगणार आहे

पुणे- चित्रपट रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) ९ ते १६ जानेवारीदरम्यान पुण्यात रंगणार आहे. महाराष्ट्र राज्याचे हीरक महोत्सवी वर्ष ही यंदाच्या पिफची मध्यवर्ती संकल्पना (थीम) असल्याची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी येथे दिली. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे व अभिजित रणदिवे आदी या वेळी उपस्थित होते. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने महोत्सवात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पिफचा उद्घाटन आणि समारोप सोहळा यंदा एफटीआयआय प्रांगणात रंगणार आहे, असेही ते म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...