आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आईच्या अकस्मात मृत्यूनंतर 2 वर्षांची चिमुकली घरात आहे एकटी\' -2 मिनिटांचा हा व्हिडिओ चुकवतो काळजाचा ठोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ पत्रकार विनोद काप्री यांनी दिग्दर्शित केलेल्या पीहू या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 5 सेकंदांचा हा व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवतो. दोन वर्षांची एक छोटीशी मुलगी घरात एकटी असताना काय काय करते हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. अकस्मात तिच्या आईचा मृत्यू आणि त्यानंतरचा छोट्या पीहूचा प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. तिचे फ्रीजमध्ये जाऊन बसणे, गॅस पेटवणे, मायक्रोवेव्ह ऑन करणे आणि त्यातच बेडवर निपचित पडलेल्या आईला सतत आवाज देणे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

 

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चिमुकल्या मायरा विश्वकर्माने यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.  देश-विदेशात या चित्रपटाला अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. ईराण, पाम स्प्रिंग्स, जर्मनी, मोरक्को, वैंकुअरसह अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हा चित्रपट दाखवण्यात आला आहे.  16 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...