Home | Maharashtra | Mumbai | PIL at High Court over CSMT bridge collapse in Mumbai

CSMT पूल दुर्घटना.. रेल्वे, महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 07:14 PM IST

 • PIL at High Court over CSMT bridge collapse in Mumbai

  मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसटीजवळील एका पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. या दूर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रेल्वे आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरीकडे, मुंबई हायकोर्टात शुक्रवारी जनहित याचिका सादर झाली आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजून 30 मिनिटांला ही दुर्घटना घडली.

  पूल दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई
  महापालिकेने पूल दुर्घटनेप्रकरणी पहिला कारवाई केली आहे. मुख्य अभियंता ए.आर पाटील, एस. एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच मुख्य अभियंता एस. ओ कोरी आणि उपमुख्य अभियंता आर.बी. तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्यात आली‍ आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

  हायकोर्टात जनहित याचिका दाखल..

  प्रदीप भालेकर यांच्यावतीने अॅड. नितीन सातपुते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 22 मार्चला सुनावणी घेण्याचे हायकोर्टाने निश्चित केले आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली.

  1980 मध्ये बांधलेल्या या पुलाचा एक भाग कोसळला तेव्हा त्यावर सुमारे 100 लोक होते. हा पूल रेल्वेने बांधला. देखभालीचे काम महापालिकेकडे होते. पुलाचे ऑडिट झाले तेव्हा सल्लागार कंपनीने पुलाची किरकोळ दुरुस्ती सुचवली होती. त्याच्या निविदा स्थायीमध्ये येणार होत्या, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

Trending