आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pilot Appeals For Treating Flogging Cases, Suspended For 3 Years Due To Alkahole More In Investigation

झडणाऱ्या केसांवर इलाज करत हाेता वैमानिक, तपासात अल्काेहोल जास्त आढळल्याने ३ वर्षांसाठी निलंबित, काेर्टात याचिका दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या एका वैमानिकाला केसगळतीवर इलाज करणे महागात पडले. त्याचे झाले असे की, गेल्या वर्षी एक वैमानिक ब्रीद अॅनालायजर चाचणीत अॅनालायझर आढळल्याने त्याला ३ वर्षांसाठी निलंबित केले हाेते. ब्रीद अॅनालायजर चाचणीत शरीरात अल्काेहल ठरलेल्या मात्रेपेक्षा जास्त आढळल्याचे कारण देत त्याला निलंबित केल्याचे वैमानिकाचे म्हणणे आहे. त्याच दिवशी काही वेळानंतर त्याने एका खासगी प्रयाेगशाळेत चाचणी केली हाेती. याच्या अहवालानुसार, त्याच्या शरीरात अल्काेहोलचे प्रमाण शून्य हाेते. त्यामुळे त्याने हवाई वाहतूक महासंचालक, हवाई वाहतूक मंत्रालयाविराेधात निलंबनाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दाेन्ही पक्षांना नाेटीस पाठवून उत्तर मागितले आहे. यासाेबत त्यादरम्यान वैमानिक नशेतच असेल असे म्हणू शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. वैमानिकाच्या म्हणण्यानुसार, ताे केस गळतीवर उपचार करत आहे. याची माहिती त्याने याआधीच दिली हाेती. डाॅक्टरांनी दिलेल्या नव्या आैषधांमध्येही अल्कोहोलचे प्रमाण सांगितले हाेते. एअर इंडियाच्या तपासात अल्काेहाेलचे प्रमाण ०.१६ ते ०.२० सांगितले, उड्डाणासाठी निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय मानक ०.४० पेक्षा कमी हाेते. ज्या दिवशी ही तपासणी झाली,यानंतर काही वेळाने वैमानिक खासगी प्रयाेगशाळेत गेला आणि शरीरातील अल्काेहोलची मात्रा तपासली. या लॅबमध्ये अल्काेहोलचे प्रमाण ०.० आले. विमान वाहतूक नियमांतर्गत चालक दलाच्या सदस्यांना उड्डाणाआधी १२ तास मद्यपान करण्यास बंदी आहे.


ब्रीद अॅनालायझर चाचणीत १८१ वैमानिक दाेषी आढळले

गेल्या चार वर्षांत देशातील १८१ वैमानिक ब्रीद अॅनालायझर चाचणीत पाॅझिटिव्ह आढळले. यामध्ये २०१५ मध्ये ४३,२०१६ मध्ये ४४ व २०१७-१८ मध्ये एकूण ९४ वैमानिकांच्या शरीरात अल्काेहोलचे प्रमाण जास्त आढळले हाेते. हवाई वाहतूक नियामकाने या प्रकरणी कठाेर भूमिका घेतली. गेल्या वर्षी एअर इंडियाचे संचालक अरविंद कठपालिया यांचे फ्लाइंग लायसन्सही ३ वर्षांसाठी निलंबित केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...