आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा भव्य सुनेजा होता इंडोनेशियात क्रॅश झालेल्या विमानाचा पायलट, मायदेशी परतण्याची होती इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

नवी दिल्ली - सोमवारी सकाळी इंडोनिशायातील समुद्रात क्रॅश झालेल्या विमान अपघातात सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स असे 189 जण ठार झाल्याची माहिती समोर येतेय. जकार्ताहून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 13 मिनिटात या विमानाशी संपर्क तुटला होता. हे विमान चालवणाऱ्या 31 वर्षीय पायलटचे नाव भव्य सुनेजा होते आणि ते मूळचे दिल्लीचे होते. जेटी-610 हे विमान जकार्ताहून पंगकल पिनॉन्गला जात होते. 

 

मूळचे दिल्लीचे होते पायलट 
>> मूळचे दिल्लीचे असणारे भव्य सुनेजा हे विमान उडवत होते.  
>> भव्य सुनेजा हे दिल्लीच्या मयूर विहारचे होते. त्यांनी येथील एल्कॉन पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले होते. 
>> सोशल मीडियावरील माहितीनुसार 2009 मध्ये सुनेजा यांना पायलटचे लायसन्स मिळाले होते. 
>> 2010 मध्ये सुनेजा यांनी ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली होती. 
>> मार्च 2011 पासून सुनेजा लायन या एअरलाइन्स कंपनीमध्ये नोकरी करत होते. याठिकाणी ते बोइंग 737 विमान उडवायचे. 
>> भव्य यांना 6000 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता अशी माहिती समोर येत आहे. 
>> सुनेजा यांना नोकरीसाठी भारतामध्ये परतण्याची इच्छा होती असे एका एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

>> लवकरच ते भारतात परतणार होते असेही ते म्हणाले. 
>> मूळचे दिल्लीचे असल्याने सुनेजा यांना दिल्लीत बदली हवी होती. 
>> सुनेजा यांना विमान उड्डाणाचा मोठा अनुभव होता. 

>> 2016 मध्ये गरीमा सेठी यांच्याशी भव्य यांचा विवाह झाला होता. 

 

(फोटोज गरीमा सेठी यांच्या फेसबूक अकाऊंटवरून)

 

बातम्या आणखी आहेत...