आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7400 फूट उंचीवर जखमी स्कीअरला पायलटने आल्प्स डोंगरावर हेलिकाॅप्टर तिरपे करून वाचवले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- फ्रान्समध्ये आल्प्सच्या शिखरावर ७४०० फूट उंचीवर एक स्कीअर जखमी झाला होता. यादरम्यान एका पायलटने फक्त ३२ मिनिटांत तेथे पाेहोचून १९ वर्षीय स्कीअर ब्रुनो व त्याच्या सहकाऱ्यास वाचवले. पायलटने बचावाच्या वेळी हेलिकॉप्टरला बर्फाच्या डोंगरावरील उतारावर तिरपे रोखून ठेवले. बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ जानेवारीची आहे. त्या वेळी ब्रिटिश स्कीइंग व स्नोबर्डस ग्रुपचा तो सदस्य आहे. ब्रुनो(१९)आल्प्स पर्वतावर जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्यालाही जखम झाली होती. ग्रुपचे सदस्य ब्रुनोला सोबत नेण्यास सक्षम नव्हते. तेव्हा गाइडने मदतीसाठी पोलिसांना बोलावले. तेथील आंतर्न पास येथे खूप उतारावर आहे. तेथे हेलिकॉप्टर उतरवणे अशक्य होते. पायलटने जखमी स्कीअरकडे हेलिकॉप्टर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. 

 

वारे जोराने वाहत होते, डोंगरावर लँड झाले नाही 
या बचाव मोहिमेतील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, निकाेलस खूप चांगला पायलट अाहे. बर्फाच्या डोंगरावर खाली वारे जोरात वाहत होते. यामुळे त्याने हेलिकॉप्टर तेथे स्थिर ठेवण्यासाठी त्याला खालच्या बाजूने झुकवून नेण्याचा निर्णय घेतला. मी स्वत: फ्रान्स एअर फोर्समध्ये फायटर पायलट होतो. हे काम किती जोखमीचे असते याची कल्पना आहे. 

 

पायलटने २० सेकंदांत स्कीअरची केली सुटका 
सुटकेप्रसंगी पायलटने हेलिकॉप्टरला बर्फाच्या डोंगरावर काही इंच दूर स्थिर ठेवले. बचाव माेहीम फक्त २० सेकंद चालली. या वेळी डोंगरावर हेेलिकॉप्टरचे समोरचे तोंड खालच्या बाजूला झुकवलेले होते. बचावानंतर ब्रुनोला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...