आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्याकाळपासून बेपत्ता होता आश्रम शाळेतील विद्यार्थी, सकाळी अशा अवस्थेत सापडला मृतदेह

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
जवळच्याच शेतात सापडला डोंगरूचा मृतदेह - Divya Marathi
जवळच्याच शेतात सापडला डोंगरूचा मृतदेह
  • बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थाने गळफास घेऊन केली आत्महत्या
  • संध्याकाळी लहान भावाशी बोलला, सकाळी उचलले टोकाचे पाउल
  • गावात स्वतःचे गॅरेज सुरू करण्याचे स्वप्न अपुरेच राहिले

पिंपळनेर - साक्री तालुक्यातील सामोडे येथे एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. डोंगरू वेडू गावीत असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव होते. तसेच ते येथील एका अनुदानित आश्रम शाळेत राहून 12 वी चे शिक्षण घेत होता. ज्या शेतात डोंगरूने आत्महत्या केली, त्याच शेतातील मालकाला शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.

साक्रीचे उप-विभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड, पी.एन. लोहार, आर.एन. कोकणी, देवेंद्र वेंदे, मनोज बैसाने आदी घटनास्थळी दाखल झाले.
 आश्रम शाळेचे अधीक्षक नामदेव वाघ यांनी दिलेल्या माहितीवरून पिंपळनेर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशासन आणि आश्रम शाळेकडून ही आत्महत्या म्हटली जात असली तरीही त्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

संध्याकाळी फोनवर बोलून झाला होता बेपत्ता


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरू शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून शाळेतून बेपत्ता होता. त्याने आपले बाहेर जाण्याचे कारण कुणालाही सांगितले नव्हते. यानंतर आश्रम प्रशासनाने शोध मोहिम सुरू केला. रात्रभर घेतलेल्या शोधात काहीच हाती लागले नाही. त्यातच शनिवारी सकाळी स्थानिक शेतकऱ्याने आपल्या शेतात युवकाचा मृतदेह लटकल्याचे पाहिले आणि पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता विद्यार्थ्याकडे शाळेच्या अधिकक्षकांसह वर्गशिक्षकांना फोन नंबर होता. त्यावरच संपर्क साधून शालेय प्रशासनाला माहिती देण्यात आली. दरम्यान सायंकाळी उशिरा डोंगरूचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

स्वतःचे गॅरेज सुरू करण्याचे स्वप्न अपुरेच


वेडू गावित यांना पत्नी व तीन मुले असून मोठ्या मुलाचे लग्न झाले आहे. डोंगरू सामोडे येथील अनुदानित आश्रम शाळेत गेल्या वर्षांपासून विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होता. तर तिसरा मुलगा साक्री येथे शिक्षण घेत आहे. ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. डोंगरूने आपल्या परिवाराला बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गावातच गॅरेज टाकायची इच्छा व्यक्त केली होती. डोंगरू याने आत्महत्येसाठी निघण्यापूर्वी शुक्रवारी संध्याकाळीच फोनवर आपल्या लहान भावाशी संपर्क साधला होता. सकाळी अचानक मृत्यूची बातमी कानावर पडल्याने भावासह सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला आहे.