आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञातांनी जाळल्या दुचाक्या, नुकसानाबरोबरच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर : घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांना अज्ञातांनी जाळून केलेल्या नुकसानिमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रात्री घराबाहेर लावलेली वाहने जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू तर झाले नाही ना असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. शंकर नथ्थु पगारे यांचे गोपाल  नगरात घर आहे. त्याठिकाणी ते कुटुंबासह राहतात. मंगळवारी १.३० वाजेच्या सुमारास शंकर पगारे व अनिल वानखेडे यांच्या घराबाहेर आगीचे लोळ दिसले. त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता दोघांची वाहने जळत असल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ घरातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेत अज्ञातांनी च्या घरासमोर असलेली ऍक्टिव्हा दुचाकी ( क्र . एमएच १८ - एक्यू २१२८) जाळली. तर, अनिल वानखेडे यांची हिरो कंपनीची फॅशन एक्स प्रो कंपनीची मोटार सायकल (क्र. एमएच १८ ओएस २०८५) या वाहनालाही आगीचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे. मात्र हे कृत्य नेमके कोणी केले हे समजू शकले नाही. 

शंकर नथ्थु पगारे व अनिल लक्ष्मण वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलिसांत अज्ञातांविरोधात अग्नी उपद्रवाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र केदार हे करीत आहेत. यापूर्वीही १७ ऑक्टोबर २०१६ रोजी शहरातील हरिओम नगरात ग्रामविकास अधिकारी एच. एन. अहिरे यांच्या बंगल्याच्या आवारात लावलेली  वाहने रात्री पेट्रोल, रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेत दोन दुचाकी व चारचाकी वाहन जळून लाखोंचे नुकसान झाले होते

बातम्या आणखी आहेत...