आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडच्या तिन्ही जागांसाठी भाजप-शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर, मावळमध्ये सस्पेंस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जारी केली आहे. यामध्ये भाजपने 125 तर शिवसेनेने 70 जणांची नावे प्रसिद्ध केली. यासोबतच पिंपरी चिंचवडमध्ये तिन्ही तिन्ही विधानसभेची उमेदवारी भाजप शिवसेना कडून जाहीर करण्यात आली आहे. परंतु, मावळच्या जागेवर नाराजी टाळण्यासाठी अजुनही सस्पेंस आहे.

विद्यमान आमदार चिंचवडमधून लक्ष्मण जगताप, भोसरीतून महेश लांडगे तर शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार यांना पिंपरीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मावळची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. स्वतः राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांच्यात चढाओढ सुरू असल्यामुळे बाळा भेगडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही असे सांगितले जात आहे. मावळमधून कुणाला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यातच आहे. दोन दिवसांत उमेदवारी जाहीर होणार असल्याचे म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...