आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंक लिगसीचा 363 कोटींत लिलाव होण्याची शक्यता, सर्वाधिक बोली लागलेला हिरा ठरणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनिव्हा - क्रिस्टीज ऑक्शन गॅलरी जिनिव्हामध्ये एक दुर्लभ पिंक डायमंड ‘पिंक लिगसी’चा लिलाव होणार आहे. या हिऱ्यासाठी पाच कोटी डॉलर (३६३ कोटी रुपये) पर्यंत बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा जगातील सर्वाधिक बोली लागलेला हिरा ठरेल. पिंक लिगसी ओपनहायमर परिवाराशी संबंधित हिरा होता.

 

या परिवाराने अनेक दशकांपर्यंत डी बीयर्स डायमंड मायनिंग कंपनी चालवली होती. मात्र, क्रिस्टीजने सध्याच्या मालकाविषयी माहिती दिलेली नाही. क्रिस्टीजच्या दागिने विभागाचे प्रमुख राहुल कादाकिया यांनी पिंक लिगसीला जगातील सर्वोत्तम हिऱ्यातील एक असल्याचे 
सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...