आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादमधून जप्त पिस्तुलाचा दाभाेलकर प्रकरणाशी संबंध नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात अालेला अाराेपी सचिन अणदुरेचा मेहुणा शुभम व अजिंक्य सुरळे तसेच त्यांचा मित्र राेहित रेगे यांच्याकडून सीबीअायने अाॅगस्ट २०१८ मध्ये अाैरंगाबादमधून एक पिस्तूल जप्त केले हाेते.

 

हे पिस्तूल सीबीअायतर्फे गुजरातमधील न्यायवैद्यकीय प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात अाले हाेते. याबाबतचा अहवाल नुकताच सीबीअायला प्राप्त झाला असून तो नकारात्मक असल्याचा दावा बचाव पक्षाचे धर्मराज चंडेल यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात काय तपास केला हे केंद्रीय अन्वेशन विभागाकडून (सीबीआय) सांगितले जाते.

 

परंतु पिस्तुलाच्या तपासात काय निष्पन्न झाले याबाबत त्यांच्याकडून काहीच खुलासा केला जात नसल्याचा आरोपही वकील चंडेल यांनी सुनावणीवेळी केला. दरम्यान, तपासासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्याचा अधिकार या न्यायालयास नसल्याचेही चंडेल यांनी मद्रास उच्च न्यायालय तसेच सर्वाेच्च न्यायालयाचे दाखले देत सांगितले. चंडेल पुढे म्हणाले, या प्रकरणी दाेषाराेपपत्र दाखल करण्यास वाढ हवी असेल तर तपास अद्याप पूर्ण का झाला नाही, सरकारी वकिलांचा अहवाल तसेच खटल्यातील महत्त्वांच्या मुद्द्यांवर काय तपास झाला, अजून काेणत्या मुद्द्यांवर तपास करावयाचा अाहे, अाराेपीला तुरुंगात का ठेवायचे अाहे या सर्व गाेष्टी सीबीअायने स्पष्ट करणे गरजेचे हाेते.

 

परंतु सीबीअायने सादर केलेल्या अहवालातून याबाबतीत ठाेस काही निष्पन्न हाेत नाही, असा आरोपही त्यांनी केला. मनीष नागोरी, खंडेलवाल यांच्याबाबत स्पष्टता नाही मनीष नागाेरी व विकास खंडेलवाल यांच्याकडून जप्त करण्यात अालेल्या पिस्तुलातून सुरुवातीला गाेळ्या झाडण्यात अाल्याचा दावा सीबीअायने केला हाेता.  

 

मात्र, पुढे काय झाले हे अद्याप सीबीअायने स्पष्ट केले नाही. तपासात सीबीअायने नेमकी काय प्रगती केली हेही  सांगितले नाही. त्यांनी वीरेंद्र तावडेंवर अाराेपपत्र दाखल केले त्याच अाराेपपत्रातील मुद्दे पुन्हा मांडून ९० दिवसांची वाढ मागितली अाहे. त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ देण्यात येऊ नये, असा युक्तिवादही चंडेल यांनी केला.  

 

रेगेकडून जप्त पिस्तुलाबाबत कधी दावाच केला नाही 
सीबीअायचे वकील बी. राजू यांनी न्यायालयामध्ये युक्तिवादादरम्यान सांगितले की, या गुन्ह्यात रेगेकडून जप्त करण्यात अालेल्या पिस्तुलाचा डॉ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्या प्रकरणात वापर असल्याचा दावा अाम्ही कधीच केलेला नाही. अमाेल काळेला गाैरी लंकेश खून प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची डाॅ. नरेंद्र दाभाेलकर प्रकरणातही भूमिका असल्याचे स्पष्ट झाले अाहे.

बातम्या आणखी आहेत...