आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत करा कालसर्प दोषाचे उपाय, दूर होईल दुर्भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल त्यांनी श्राद्ध पक्ष काळात हा दोष दूर करण्यासाठी उपाय आणि पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतात तसेच कालसर्प दोषाचे दुष्प्रभाव कमी होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य  पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार कालसर्प दोष मुख्यतः 12 प्रकारचे असतात. जन्म कुंडलीचे अध्ययन करून तुमच्या कुंडलीत कोणता दोष आहे हे समजू शकते. यावर्षी 25 सप्टेंबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत श्राद्धपक्ष राहील. कालसर्प दोष शांतीसाठी श्राद्ध पक्षात येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता...


1 - अनंत कालसर्प दोष
- कुंडलीत हा दोष असल्यास श्राद्ध पक्षात एकमुखी, आठमुखी किंवा नऊमुखी रुद्राक्ष धारण करा.
- या दोषामुळे आरोग्य ठीक नसेल तर श्राद्ध काळात शीसं (एक धातू) चा शिक्का पाण्यात प्रवाहित करा.


2 - कुलकी कालसर्प दोष
- कुलकी कालसर्प दोष असल्यास श्राद्ध पक्षात गरम कपडे दान करा.
- चांदीची भरीव गोळी तयार करून पूजा करावी आणि गोळी स्वतःजवळ ठेवा.


3 - वासुकी कालसर्प दोष
- वासुकी कालसर्प दोष असल्यास व्यक्ती रात्री झोपताना डोक्याजवळ थोडीशी बाजरी ठेवावी. सकाळी उठल्यानंतर पक्ष्यांना ही बाजरी टाकावी.
- श्राद्ध काळात कोणत्याही दिवशी लाल दोऱ्यात तीन, आठ किंवा नऊमुखी रुद्राक्ष धारण करावा.


4 - शंखपाल कालसर्प दोष
- शंखपाल कालसर्प दोष निवारण करण्यासाठी श्राद्ध पक्षात कोणत्याही दिवशी 400 अखंड बदाम नदीमध्ये प्रवाहित करा.
- श्राद्ध काळात शिवलिंगावर नियमित दुध अर्पण करा.


5 - पद्म कालसर्प दोष
- पद्म कालसर्प दोष असल्यास श्राद्ध पक्षात कोणत्याही दिवसापासून सुरुवात करून 40 दिवस दररोज सरस्वती स्तोत्राचे पाठ करावेत.
- गरजू लोकांना पिवळे वस्त्र दान करावेत आणि तुळशीचे रोप लावावे.


6 - महापद्म कालसर्प दोष
- महापद्म कालसर्प दोष असल्यास हनुमान मंदिरात जाऊन सुंदरकांडचे पाठ करावेत.
- श्राद्ध काळात गरिबांना अन्नदान करून दान-दक्षिणा द्यावी.


7 - तक्षक कालसर्प दोष
- तक्षक कालसर्प दोष असल्यास 11 नारळ नदीमध्ये प्रवाहित करा.
- पांढरे कपडे आणि तांदूळ दान करावेत


8 - कर्कोटक कालसर्प दोष
- कर्कोटक कालसर्प दोष असल्यास भैरवाच्या मंदिरात जाऊन दही-गुळाचा नैवेद्य दाखवून पूजा करावी
- आरशाचे आठ तुकडे पाण्यामध्ये प्रवाहित करावेत.


कालसर्प दोषाचे इतर प्रकार आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...