आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा : श्राद्ध पक्षामध्ये कशामुळे खाऊ नये लसूण आणि कांदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्राद्ध पक्ष (25 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत) काळात करण्यात येणाऱ्या तर्पणामुळे पितृ देवता प्रसन्न होतात आणि त्याच्या कृपेने घर-कुटुंबाची सुख-समृद्धी कायम राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्राद्ध पक्षात आहार आणि दिनचर्येत काही बदल करणे आवश्यक आहे. श्राद्धामध्ये लसूण, गाजर, कांदा, दही मिसळलेले पीठ किंवा खाण्याचे इतर पदार्थ वर्ज्य आहेत.


श्राद्ध पक्षात कशामुळे खाऊ नये लसूण-कांदा
शास्त्रानुसार लसूण आणि कांदा तामसिक अन्नपदार्थ आहेत. तामसिक पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या विचारातील पावित्र्य नष्ट होऊ शके, स्वभाव रागीट बनतो. मन एकाग्र होत नाही. श्राद्धाचा काळ पूजा आणि ध्यानासाठी श्रेष्ठ सांगण्यात आला आहे. या कर्मासाठी मनाची एकाग्रता आणि पावित्र्य असणे आवश्यक आहे. यामुळे श्राद्ध काळात हे पदार्थ खाणे वर्ज्य सांगण्यात आले आहे.


लसूण-कांद्याशी संबंधित धार्मिक मान्यता 
जो व्यक्ती श्राद्ध काळात वर्जित गोष्टींचे सेवन करतो त्यावर पितृ देवता नाराज होऊ शकतात. मान्यतेनुसार पितृ देवता नाराज झाल्यास घरामध्ये सुख-समृद्धी टिकत नाही. कुटुंबातील सदस्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पितर देवतांच्या कृपेशिवाय इतर देवी-देवतांची कृपाही प्राप्त होऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...