आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील अशांती, दुर्भाग्य आणि सर्व अडचणी दूर करण्यासाठी श्राद्ध पक्षात करा हे 5 काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 25 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरु होत असून 9 ऑक्टोबरपर्यंत राहील. त्यानंतर नवरात्र सुरु होईल. श्राद्ध पक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय करण्याची परंपरा आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पितृ पक्षात येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास घरातील अशांती, दुर्भाग्य आणि सर्व अडचणी दूर होऊ शकतात. पितृ पक्षामध्ये घरातील पितरांसाठी विशेष उपाय केले जातात. येथे जाणून घ्या, काही खास उपाय...


पहिला उपाय
दररोज घरामध्ये पितरांच्या नावाने धूप अवश्य द्यावी. यासाठी जळत्या शेणाच्या गोवरीवर भाजी-पोळीचे छोटे-छोटे तुकडे अर्पण करावेत. दिवा लावावा आणि हार-फुल अर्पण करावेत.


दुसरा उपाय
एखाद्या गरिबाला काळी घोंगडी किंवा पांघरून दान करावे.


तिसरा उपाय
एखाद्या गोशाळेत हिरवा चारा दान करावा.


चौथा उपाय 
शिवलिंगावर जल आणि काळे तीळ अर्पण करावेत.


पाचवा उपाय 
स्वयंपाकातील पहिली पोळी गायीला आणि शेवटची श्वानाला खाऊ घालावी.


हे सर्व उपाय केल्याने पितृ दोष आणि कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो. धन संबंधित कामातील अडचणी दूर होतात. पितर देवतांच्या कृपेने दुर्भाग्यातून मुक्ती मिळते.

बातम्या आणखी आहेत...