आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबात एखाद्याचा अकाली मृत्यू झाला असेल आणि त्याचे योग्य विधीने श्राद्ध झाले नसेल तर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या श्राद्ध पक्ष सुरु असून या काळात पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते. ज्योतिषमध्ये पितरांच्या संबंधित एक दोष सांगण्यात आला आहे, ज्याला पितृ दोष असे म्हणतात कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार पितृदोष संदर्भात मान्यतेनुसार कुटुंबात एखाद्याचा अकाली मृत्यू झाले असेल आणि मृत व्यक्तीचे योग्य पद्धतीने श्राद्ध केले नसेल तर त्या घरात जन्म घेणाऱ्या अपत्याच्या कुंडलीत पितृ दोष राहतो. विशेषतः पुत्र अपत्याच्या कुंडलीत हा दोष राहतो. यामुळे अशा लोकांना जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागते.


पितृ दोषाशी संबंधित कुंडलीतील योग
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्यावर राहूची दृष्टी पडत असेल किंवा सूर्य आणि राहूची युती असल्यास पितृदोष तयार होतो. या दोषामुळे सूर्याचे सकारात्मक फळ कमी होतात. कुंडलीत राहू-सूर्यासोबत असेल किंवा राहू पाचव्या स्थानात असल्यास किंवा सूर्य राहूच्या नक्षत्रामध्ये असल्यास पितृदोष तयार होतो.


1. ज्या व्यक्तीच्या जन्म कुंडलातील पितृ दोष असेल, त्याला अपत्य सुख प्राप्त होत नाही. पती-पत्नी निरोगी, सक्षम असले तरी त्यांना अपत्य प्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होतात.


2. एखाद्या व्यक्तीच्या घरात उत्तर-पूर्व (ईशान्य) किंवा पश्चिम-दक्षिण (नैऋत्य) दिशेला शौचालय असल्यास हासुद्धा पितृ दोषाचा संकेत आहे.


3. काही लोकांच्या कुंडलती पितृदोषाचा एवढा प्रभाव राहतो की, त्यांना स्थावर मालमत्ता, पैशांच्या बाबतीत खूप नुकसान सहन करावे लागू शतके.


4. पितृ दोषामुळे धन असूनही घरात सुख-शांती राहत नाही.


5. घरामध्ये पितृ स्थान दक्षिण-पश्चिम कोपरा म्हणजे नैऋत्य दिशा मानले गेले आहे. कुंडलातील पितृ दोष असल्यास राहू मजबूत होतो. याचा प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो.


6. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह ईशान्य दिशेकडून आणि नकारात्मक ऊर्जेचा नैऋत्य दिशेकडून. कुडणालीत पितृदोष म्हणजे राहू मजबूत असते आणि अशा घरातील नैऋत्य दिशेला वास्तुदोष असतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार संकेत...

बातम्या आणखी आहेत...