आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृपक्ष 28 सप्टेंबरपर्यंत, पितरांसाठी गूळ, तूप आणि धान्य दान करण्याची परंपरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पितृ-पक्ष सुरु असून या पक्षामध्ये पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान इ. शुभकर्म केले जातात. यावर्षी पितृ पक्ष 14 सप्टेंबरपासून सुरु होत असून 28 सप्टेंबरपर्यंत चालेल. या दरम्यान पितरांसाठी दान-पुण्य करण्याची प्रथा आहे. मान्यतेनुसार जे लोक पितरांसाठी पुण्यकर्म करतात, त्यांच्या घरात सुख-समृद्धी कायम राहते.

या गोष्टींचे करू शकता दान 
श्राद्ध पक्षामध्ये गूळ, तूप, धान्य, गाय, काळे तीळ, भूमी, मीठ, वस्त्र इ. गोष्टींचे दान करू शकता. या गोष्टी दान केल्याने वेगवेगळे फळ प्राप्त होते. गूळ दान केल्याने घरातील क्लेश दूर होतो, गाय दानाने सुख-समृद्धी वाढते. तुपाचे दान केल्याने शक्ती वाढते. धान्य दान केल्यास घरात धन-धान्य कमी पडत नाही. भूमी दान केल्याने धन-संपत्ती वाढते. काळे तीळ दान केल्याने आरोग्य लाभ होतो.

पितृ पक्षामध्ये करावेत हे शुभ काम
पितृ पक्षामध्ये गरीब आणि गरजू लोकांना जेवू घालावे. धन आणि ध्यान दान करावे. सध्या पावसाळा सुरु असून, या काळात अनेक लोकांना रोजगार मिळत नाही. अशा लोकांसमोर खाण्याचे संकट उभे राहते. अशा लोकांची मदत करण्यासाठी  धान्य, धन, फळ, कपडे या गोष्टींचे दान करावे. दान केल्याने पितरांची विशेष कृपा प्राप्त होते.

- ज्या लोकांना पितृ पक्षामध्ये विधिव्रत श्राद्ध कर्म करणे शक्य नसेल त्यांनी एखाद्या पवित्र नदीमध्ये काळे तीळ वाहून तर्पण करावे. मंदिरात किंवा एखाद्या ब्राह्मणाला काळे तीळ दान केल्यानेही पुण्यफळ प्राप्त होते.

- श्राद्धपक्ष काळात गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. रोज सकाळी लवकर उठावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा.

- भगवत गीतेचे पाठ करावेत आणि त्यामध्ये सांगण्यात आलेल्या नीतींचा जीवनात अवलंब करावा. घरामध्ये शांतता ठेवावी. क्लेश करू नये. अधार्मिक कर्म करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या श्राद्ध कर्माचे फळ मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...