आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तिथी माहिती नसल्यास केव्हा करू शकता त्याचे श्राद्ध कर्म

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या श्राद्धपक्ष सुरु आहे. या दिवसांमध्ये मृत लोकांचे तिथीनुसार श्राद्धकर्म करावे. प्रत्येक वर्षी भाद्रपद मासातील कृष्ण पक्षात पितृपक्ष येतो. यावर्षी 14 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत पितृ पक्ष राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार व्यक्तीचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्याचे श्राद्ध त्याच तिथीला केले जाते. येथे जाणून घ्या, एखाद्या व्यक्तीची मृत्यू तिथी माहिती नसल्यास कोणत्या तिथीला श्राद्ध करावे.

भाद्रपद कृष्ण पंचमी (19 सप्टेंबर)
जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अविवाहित स्थितीमध्ये झाला असेल तर त्याचे भाद्रपद कृष्ण पंचमी तिथीला श्राद्ध करावे.

भाद्रपद कृष्ण नवमी (23 सप्टेंबर)
ज्या स्त्रीचा मृत्यू पतीच्या मृत्यीपूर्वी झाला असेल तिचे श्राद्ध या तिथीला करावे. या तिथीला श्राद्ध केल्यास कुटुंबातील सर्व मृत महिलांना तृप्ती मिळते. या तिथीला अविधवा नवमी असेही म्हणतात.

भाद्रपद कृष्ण एकादशी (25 सप्टेंबर)
पितृ पक्षातील एकादशी तिथीला मृत संन्यासी लोकांचे श्राद्ध करावे.

भाद्रपद कृष्ण त्रयोदशी (27 सप्टेंबर)
मृत मुलांचे श्राद्ध पितृ पक्षातील त्रयोदशी तिथीला केले जाते.

भाद्रपद कृष्ण चतुर्दशी (27 सप्टेंबर)
ज्या लोकांचा मृत्यू शस्त्र म्हणजे हत्याराने, आत्महत्या केल्याने, विष घेतल्याने झाला असेल अशा लोकांचे श्राद्ध या तिथीला करावे.

सर्वपितृ मोक्ष अमावस्या (28 सप्टेंबर)
ही श्राद्ध पक्षातील शेवटची तिथी आहे. संपूर्ण श्राद्ध पक्षात कोणाचे श्राद्ध विसरले असल्यास या तिथीला मृत व्यक्तीचे श्राद्ध केले जाते.

बातम्या आणखी आहेत...