आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृ पक्षामध्ये रोज करावे तर्पण, पितरांना अंगठ्याने जल अर्पण करण्याची परंपरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पितृ पक्ष सुरु असून या दिवसांमध्ये पितरांसाठी श्राद्ध तर्पण आणि इतर शुभ कर्म केले जातात. पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध पक्षात दररोज तर्पण करावे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार तर्पण करताना हातामध्ये पाणी घेऊन अंगठ्याने पितरांना पाणी अर्पण करावे. येथे जाणून घ्या, या परंपरेशी संबंधित काही खास गोष्टी....

अंगठ्याने जल अर्पण केल्याने पितरांना मिळते तृप्ती 
श्राद्ध कर्म करताना शिजवलेले तांदूळ, दूध आणि काळे तीळ मिसळून पिंड तयार केले जाते. या पिंडांना मृत व्यक्तीचे शरीर प्रतीक मानले जाते. पिंडांवर अंगठ्याने हळू-हळू जल अर्पण केले जाते. मान्यतेनुसार अंगठ्याने पितरांना जल अर्पण केल्यास ते तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.

अंगठ्याजवळ असते पितृ तीर्थ  
हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार अंगठ्याजवळील भागाचे कारक पितर देवता असतात. यालाच पितृतिर्थ असेही म्हणतात. हातामध्ये पाणी घेऊन अंगठ्याच्या माध्यमातून अर्पण केलेले जल पितृपीर्थापासून पिंडांपर्यंत जाते. यामुळे पितरांना तृप्ती मिळते आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात.

पितृ पक्षात या गोष्टींकडेही लक्ष द्यावे
पितृ पक्षामध्ये कर्म करणाऱ्या व्यक्तीने अधार्मिक कार्यापासून दूर राहावे. जे लोक या काळात वाईट काम करतात यांची पूजा, श्राद्ध कर्म निष्फळ होते. पितृ पक्षामध्ये एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावे आणि त्यानंतर गरिबांना दानामध्ये धान्य आणि धन द्यावे. घर-कुटुंबात ठेवावी शांतता. क्लेश करू नये.

बातम्या आणखी आहेत...