आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोक्ष दायिनी भूमी आहे गया, येथे धर्मराज यम, ब्रह्मा आणि विष्णूंचा वास 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीपासून अमावास्येपर्यंतचा काळ पितृपक्ष मानला जातो. वैदिक परंपरा आणि हिंदू मान्यतेनुसार पितरांचे श्रद्धापूर्वक श्राद्ध करणे एक महान आणि उत्कृष्ट कर्म आहे. या काळामध्ये घरातील मृत व्यक्तीचे विधिव्रत श्राद्ध करावे. यासाठी देवतांनी मनुष्यासाठी पृथ्वीवर काही ठिकाण दिले आहेत. यामधीलच एक ठिकाण आहे गया. याठिकाणी श्राद्ध आणि तर्पण केल्यास पितरांना तृप्ती तसेच मोक्ष मिळतो. महाभारतानुसार गयामध्ये धर्मराज यम, ब्रह्मा, शिव आणि विष्णू यांचा वास मानला गेला आहे.

श्राद्धाचा अर्थ 
आपल्या पितरांविष्यी श्रद्धा प्रकट करणे. पुराणानुसार, मृत्यूनंतर जीवाचा पवित्र आत्मा कोणत्या न कोणत्या रूपात श्राद्ध पक्षामध्ये आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतो. पितरांचे कुटुंबीय तर्पण करून त्यांना तृप्त करतात. यावर्षी 14 सप्टेंबर शनिवारपासून श्राद्धपक्ष सुरु होत आहे.

प्रभू श्रीरामांनी येथे केले होते श्राद्ध 
गया येथे जाऊन पितरांचे श्राद्ध केल्यास सात पिढ्यांचा उद्धार होतो. धार्मिक मान्यतेनुसार येथे भगवान विष्णू पितृदेवतेच्या रूपात उपस्थित आहेत, यामुळे या ठिकाणाला पितृतिर्थ असेही म्हणतात. पिंडदानाला मोक्ष प्राप्तीचा एक सहज आणि सरळ मार्ग मानले जाते. मान्यतेनुसार भगवान श्रीराम आणि देवी सीता यांनी राजा दरशरथ यांच्या आत्मशांतीसाठी गया येथे पिंडदान केले होते.

बातम्या आणखी आहेत...