आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवशी श्राद्ध केल्याने मिळते सुंदर पत्नी, 12 दिवशी केल्याने होतो धनलाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून अश्विन मासातील अमावास्येपर्यंतचा काळ पितरांच्या तर्पण, श्राद्ध व पिंडदानासाठी उत्तम मानण्यात आला आहे. या 16 दिवसांना श्राद्ध पक्ष म्हटले जाते. धर्म ग्रंथानुसार ज्या तिथीला घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्याच दिवशी त्यांचे श्राद्ध करावे. हाच श्राद्धाचा नियम आहे. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये भीष्माने युधिष्ठिरला श्राद्ध संदर्भात विस्तृत ज्ञान दिले आहे. भीष्माने युधिष्ठिरला हेही सांगितले होते की, कोणत्या तिथीला आणि नक्षत्रामध्ये श्राद्ध केल्यास त्याचे काय फळ मिळते.


1. महाभारतानुसार प्रतिपदा तिथीला पितरांची पूजा केल्यास अतिशय सुंदर आणि सुयोग्य आपत्यांना जन्म देणार्‍या सुंदर स्त्रीची प्राप्ती होते. 


2. द्वितीया तिथीला श्राद्ध केल्यास घरामध्ये मुलीचा जन्म होतो.


3. तृतीय तिथीला श्राद्ध केल्यास घोडे मिळतात. 


4. चतुर्थी तिथीला श्राद्ध केल्यास छोट्या-छोट्या पशूंची प्राप्ती होते. 


5. पंचमी तिथीला श्राद्ध केल्यास पुत्र प्राप्ती होते.


6. षष्ठी तिथीला श्राद्ध केल्यास सौंदर्‍यामध्ये वृद्धी होते. 


7. सप्तमी तिथीला श्राद्ध केल्यास शेतीमध्ये लाभ होतो. 


8. अष्टमी तिथीला श्राद्ध केल्यास व्यापारात लाभ होतो.


9. नवमी तिथीला श्राद्ध केल्यास खुर असणारे (घोडे-गाढव) यांच्यामध्ये वृद्धी होते. 


10. दशमी तिथीला श्राद्ध केल्यास गौ धनामध्ये वृद्धी होते.

बातम्या आणखी आहेत...