आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध यशस्वी आणि पितरांच्या दोषातून मुक्तीसाठी यावेळी दोन कामे अवश्य करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 सप्टेंबर, सोमवारपासून महालया म्हणजेच श्राद्धपक्ष सुरु होत आहे. ग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, श्रद्धा आणि श्राद्धामध्ये घनिष्ठ संबंध आहे. श्राद्धामध्ये श्राद्धकर्त्याचा अतूट विश्वास असतो की पितरांच्या कल्याणासाठी ब्राह्मणाला जे काही दिले जाते, ते पितरांना अवश्य मिळते.


वेदामध्ये सांगण्यात आले आहे की-
आयुः पूजां धनं विद्यां स्वर्ग मोक्ष सुखानि च। 
प्रयच्छति तथा राज्यं पितरः श्राद्ध तर्पिता॥


अर्थ - जे लोक आपल्या पितरांचे श्राद्ध श्रद्धापूर्वक करतात, त्यांचे पितर संतुष्ट होऊन त्यांना आयु, अपत्य, धन, स्वर्ग, राज्य, मोक्ष आणि इतर सौभाग्य प्रदान करतात.


श्राद्धामध्ये लावावे एक झाड... 
या वर्षी पितरांच्या आठवणीत असे काही करावे ज्यामुळे पितरांना संतुष्टी मिळेल आणि मनुष्याचे कल्याण होईल. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि आपण वायू प्रदूषणापासून दूर राहावे. सध्याच्या काळात कार्बन मोनोऑक्साइड, सल्फरडायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइडसहित इतर विविध विषारी घटक जास्त प्रमाणात वाढत आहेत. श्राद्ध पक्षामध्ये केवळ पितरांना तर्पण न करता त्यांच्या नावाने एक झाड अवश्य लावावे. यामुळे पितरांचा शुभाशीर्वाद मिळेल तसेच पर्यावरणही प्रदूषणमुक्त होईल.


हा उपायही करावा 
छोटासा यज्ञ केल्याने यज्ञाचा दिव्यगंध आणि भावना समस्त सृष्टीच्या जीवाला लाभ पोहोचवतो. अशाचरप्रकारे कृतज्ञताची भावना प्रकट करण्यासाठी केलेले श्राद्ध समस्त सृष्टीमध्ये शांतिमय सद्भावनेच्या लहरी पोहोचवते. हे सूक्ष्म भाव-तरंग तृप्तिकराक आणि आनंददायक असतात. सद्भावना तरंग जीवित आणि मृत सर्वांना तृप्त करतात, परंतु बहुतांश भाग अशा लोकांपर्यंतच पोहोचतो ज्यांनी श्राद्ध विशेष प्रकारे केले असेल. धार्मिक कर्मकांडापेक्षाही महत्त्वपूर्ण भावना आहेत, ज्या अनुष्ठानामागे काम करतात. यामुळे पूर्ण श्रद्धा आणि चांगल्या भावनेने केलेले कर्मकांड शुभफळ प्रदान करते.


लेखक - अखिल विश्व गायत्री परिवार प्रमुख व देव संस्कृती विश्वविद्यालयाचे कुलाधिपती आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...