आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Piyush Goyal News Update: Union Commerce And Industry Minister Trolled For His Remarks 'Einstein Discovered Gravity'

पीयूष गोयल म्हणतात, गुरुत्वाकर्षणाचा शोध आइंस्टाइनने लावला! ट्रोल झाल्यानंतर दिले असे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना सोशल मीडियावर सध्या ट्रोल केले जात आहे. विविध मीम्स तयार करून लोक त्यांनी थट्ट उडवत आहेत. प्रकरण असे, की त्यांनी एका व्यावसायिक मंडळाच्या बैठकीत बोलताना गुरुत्वाकर्षणावर आपले ज्ञानाचे डोस दिले. त्यांच्या मते, आइंस्टीनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यात गणित कामी आला नव्हता. ओघात त्यांनी न्यूटनचा उल्लेख न करता आइंस्टाइनचे नाव घेतले आणि ट्रोलर्सला नवा विषय मिळाला.

माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला -गोयल
गोयल म्हणाले, "ट्रेड बोर्डाच्या बैठकीत भारतीय उद्योग आणि व्यापाराला प्रोत्साहित करण्यासाठी मी बोलत होतो. येत्या 5 वर्षांमध्ये निर्यातीचे लक्ष्य 1 ट्रिलियन डॉलर करण्याबाबत मी सांगत होतो. त्या ठिकाणी करण्यात आलेली विधाने चुकीचा अर्थ लावून माध्यमांवर दाखवण्यात आली आहेत. फक्त एकाच ओळीवरून चुकीच्या पद्धतीने माझे वक्तव्य दाखवले जात आहे." प्रत्यक्षात, बैठकीमध्ये बोलताना पीयूष गोयल उद्योजकांना गणिताची परवा करू नका असे सांगत होते. याचे उदाहरण देताना त्यांनी म्हटले होते, की आइंस्टाइनला गुरुत्वाकर्षाचा शोध लावताना गणित काहीच कामी आला नाही. आता ते आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना दिसून येत आहेत. मी त्या ठिकाणी केवळ आयडियावर बोलत होतो असेही गोयल म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...