आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - 'बालपणी खूप दाबला गेलो, तरुणपणी कम्युनिस्ट झालो आणि आज विपश्यनेनं माझं आयुष्य बदलून टाकलं, पण प्रतिक्रियावादी राहिलो म्हणून कवी म्हणून जिवंत राहिलो, आपलं आयुष्य आपल्या मर्जीनुसार जगलो', अशा अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत प्रख्यात कवी, गीतकार आणि अभिनेते पीयूष मिश्रा यांनी आपला जीवनप्रवास मांडला.' दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल'मधील 'आरंभ हो प्रचंड' या सत्रात दैनिक भास्कर डिजिटलचे संपादक अनुज खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
स्वत:ला शोधत राहिलो...
'जिंदा रहने में और सास लिने मे फर्क होता है..' ही कविता आपण दहावीत लिहिली होती, पण निम्म्या लोकांना ती समजली नाही तर निम्म्या लोकांनी विश्वासच ठेवला नाही, या प्रसंगापासून त्यांनी आपला कला प्रवास या वेळी मांडला. त्यानंतर दिल्लीतील नाटक, मुंबईतील सिनेमा, कविता आणि आता बँड इथपर्यंतच प्रवास त्यांनी उलगडला. 'स्वतःला शोधत राहिलो, आयुष्यात धडपडत राहिलो,
अपनी जिंदगी अपनी शर्थोपर जी ली, बडा मजा आया' या शब्दांत त्यांनी आपला जीवन प्रवास मांडला, मात्र राजकरणापासून मुलींवरील बलात्कारासारख्या घटनांनी व्यथित होत आपल्या कविता जन्म घेत असल्याचे ते म्हणाले.
नाटकाने घडवलं...
नाटकाने आपल्याला घडवलं, तिरकस विचार करायला, नवनवीन प्रयोग करायला शिकवलं, मात्र बरंच बेजबाबदार वागलो, पण भानावर येताच सावरलोही, या शब्दांत त्यांनी स्वतःच्या आयुष्याची, त्यातील चढ-उतारांची कबुली दिली. 'विसाव्या वर्षी कम्युनिस्ट झालो, 30 व्या वर्षी कम्युनिझम सोडला, 50 व्या वर्षी ध्यान शिकलो, या प्रत्येक टप्प्यात स्वतःला शोधत राहिलो,' असे ते म्हणाले. कम्युनिझम पुढे काय, याचा विचार करताना आपल्या आयुष्यात 'ध्यान' आलं, 2000 साली विपश्यना केली आणि त्यानंतर 'गुलाम ते गॅंग्ज ऑफ वासेपूर'सारख्या कलाकृती घडल्या, असे ते म्हणाले. अॅक्ट वन या समांतर नाट्य चळवळीनं आपल्याला घडवलं हे सांगत असताना काव्यातील राजकीय भाष्य तेथूनच मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कवीचं काम जगातलं नग्न सत्य मांडण हेच आहे, कपडे शिवणं हे तर शिंप्याचं काम, या मार्मिक शब्दांत त्यांनी कलाकारांची भूमिका विशद केली.
दैनिक भास्कर डिजिटलचे संपादक अनुज खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सरस्वती भुवन संस्थेतील पु. ल. देशपांडे सभागृहात झालेल्या या संवाद सत्रात कला, नाट्य, लेखन विषयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने, उत्सुकतेने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. कविता, गाणी आणि लिखाण याबद्दलच्या त्यांच्या प्रश्नांची पीयूष मिश्रा यांनी रोचक उत्तरे दिली.
या कवितांनी केली खुमासदार पेरणी
- जिंदा रहने में और सास लेने मे फर्क होता है
सास लनेनेवाला शक्स
- एक बगल मे चांद होगा, एक बगल मे रोटीया
एक बगल मे निंद होगी, एक बगल मे लोरिया
- वो काम भला क्या काम हुआ,
वो इशक भला क्या इशक हुआ
पीयूष मिश्रा म्हणाले...
- पहिली 30 वर्षे कोणाला मी समजलो नाही.
- सिनेमाने मला मोठं केलं.
- कम्युनिझममुळे जगण्याच ध्येय शिकलो.
- खूप काम करण्याची सवय लागली.
- 'भारत एक खोज'ने संधी दिली.
- सगळ्यांसारखाच संघर्ष केला.
- दिल्लीने नाटक दिलं, मुंबईने सिनेमा.
- विपश्यनेनं शांतता दिली.
- व्यसन करून लिखाण होतं हा गैरसमज.
- नाटकामुळे तिरकस विचारांची सवय जडली.
- सभोवतालवर प्रतिक्रियात्मक कविता निपजली.
- तर्काशिवाय गाणं अशक्य.
- दुनियेचं नग्न सत्य सांगणं हेच कवीचं काम.
नास्तिक ते आस्तिक व्हाया विपश्यना
20 व्या वर्षी नास्तिक होतो, आज आस्तिक बनलो आहे. दुनिया बदलण्याच स्वप्न कम्युनिसम् ने दिलं. पण दुनिया बदलत नाही, उलट ' मी आज जिवंत का' या प्रश्नाचं उत्तर कम्युनिसम् मध्ये नाही. तरूनपणी मी नास्तिक होतो, पुढे या प्रश्नाच्या शोधत नास्तिक बनलो आहे. हे भारतीय संस्कृतीतील आश्रम स्थितीसारखं आहे. विसाव्या वर्षी कम्युनिस्ट झालो आणि तिसाव्या वर्षी आस्तिक, म्हणून तुमच्या पुढे हा असा आहे, हा बदल मिश्रा यांनी मांडला.
सत्र सुरू असताना, अचानक सभागृहाच्या मागून आला आवाज...
पीयूष मिश्रा यांचे सत्र सुरू असताना, सभागृहाचा मागच्या बाजूकडून एक प्रश्न आला, तुमचे बालपण कसे गेले आणि ध्यानानं तुमच्या जगण्यात काय बदल झाला? संपूर्ण सभागृहाच्या नजरा मागे वळल्या तेव्हा अभिनेता जितेंद्र जोशी हा प्रश्न विचारत असल्याचे लक्षात आल्यावर प्रेक्षक चकित झाले. 'ध्यान' हे स्वतःवर, स्वतःच्या एकटेपणावर प्रेम करायला शिकवत, तरुणांनी आपल्या आयुष्यातील 10 दिवस काढून अवश्य विपश्यना करावी, असा सल्ला पीयूषजींनी जितेंद्रच्या माध्यमातून तरुणांना दिला.
पुढच्या स्लाइडवर पाहा, या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.