आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

डेव्हिड वाॅर्नर सलग पाचव्या सत्रात 500 पेक्षा अधिक धावा काढणारा पहिला; हैदराबादचा पाचवा विजय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी १२ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये पाचव्या विजयाची नाेंद केली. यजमानांनी आपल्या घरच्या मैदानावर दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्सला पराभूत केले. हैदराबादने ९ गड्यांनी सामना जिंकला. जाॅनी बैयरस्ट्राेने (८०) नाबाद अर्धशतकी खेळीसह हैदराबादसाठी झटपट १५ षटकांत विजयश्री खेचून आणली. तसेच डेव्हिड वाॅर्नरने संघाच्या विजयात माेलाचे अर्धशतकाचे याेगदान दिले. 


पाहुण्या काेलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना क्रिस लीनच्या (५१) अर्धशतकाच्या बळावर यजमान हैदराबादसमाेर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात हैैदराबादने १५ षटकांत एका गड्याच्या माेबदल्यात सहज लक्ष्य गाठले. त्यामुळे हैदराबादला पाचव्या विजयाची नाेंद करता आली. दुसरीकडे काेलकाता संघाने यंदाच्या लीगमध्ये सलग पाचवा सामना गमावला. सुमार खेळीमुळे टीमला आपली पराभवाची मालिका खंडित करता आली नाही. रसेलही या सामन्यात आपली चमक दाखवू शकला नाही. 


बैयरस्ट्राे-वाॅर्नरने रचला विजयाचा पाया : 
सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बैयरस्ट्राे या जाेडीने हैदराबादच्या माेठ्या विजयाचा पाया रचला. त्यांनी काेलकात्याची सुमार गाेलंदाजी फाेडून काढली. यासह त्यांनी पहिल्या विकेटसाठी १३१ धावांची माेठी भागीदारी रचली. यातून त्यांनी संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. दरम्यान, वाॅर्नर बाद झाला. त्याने ३८ चेंडूंचा सामना करताना ३ चाैकार आणि ५ षटकारांच्या आधारे ६७ धावांची खेळी केली. 


बैयरस्ट्राेच्या ९ डावात ६४ च्या सरासरीने ४४५ धावा. यात १ शतक व २अर्धशतके 
जाॅनी बैयरस्ट्राेचे दुसरे अर्धशतक : जाॅनी बैयरस्ट्राेने आयपीएलमध्ये दुसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याने नाबाद ८० धावांची खेळी केली. त्याने ४३ चेंडूंमध्ये ७ चाैकार आणि ४ षटकारांच्या आधारे ही खेळी केली. त्याने संघाचा विजय निश्चित केला. त्याने ९ डावात ४४५ धावा काढल्या आहेत. 


वाॅर्नरने गाठला पाचशेचा पल्ला : अर्धशतकी खेळीच्या आधारे डेव्हिड वाॅर्नरने रविवारी विक्रमी कामगिरीची नाेंद झाली. ताे सलग पाचव्या सत्रात ५०० पेक्षा अधिक धावा काढणारा पहिला फलंदाज ठरला. त्याच्या नावे यंदा ५१७ धावांची नाेंद झाली.

0