आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3500 फूट उंचीवर बिघाडामुळे शाळेजवळच कोसळले विमान, इंदापूर तालुक्यात अपघात सुदैवाने मोठा अनर्थ टळला, वैमानिक जखमी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - इंजिनमध्ये आलेल्या अचानक बिघाडामुळे वैमानिकांना प्रशिक्षण देणारे एक विमान मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील रुई बाबीर या गावातील शाळेच्या मैदानावर कोसळले. यात वैमानिक किरकोळ जखमी झाला. 


बारामतीमध्ये कार्व्हर एव्हिएशन संस्थेकडून प्रशिक्षणार्थी वैमानिकांना उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाते. या परिसरात राखीव वनक्षेत्र असल्याने सातत्याने विमानांचे उड्डाण सुरू असते. मंगळवारी वैमानिक सिद्धार्थ टायट यांनी विमानासह उड्डाण केले. साडेतीन हजार फूट उंचीवर विमानात बिघाड झाला. त्यामुळे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. लँडिंगसाठी त्यांना रुई बाबीरच्या शाळेजवळ योग्य जागा दिसली. त्यानुसार, लँडिंगचा प्रयत्न केला. परंतु, सुमारे २०० फूट उंचीवर असतानाच विमानाचे संतुलन बिघडले व पुढील भाग जमिनीला धडकला. 


घटनास्थळापासून २०० फूट अंतरावर होती शाळा 
विमान कोसळलेल्या मैदानापासून अगदी २०० फूट अंतरावर श्री बाबीर विद्यालयाची इमारत आहे. मंगळवार हा शाळेचा दिवस असल्याने वर्गांमध्ये विद्यार्थी शिकत होते. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमानावर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. 

बातम्या आणखी आहेत...