आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीड्स मैदानावरून उडाले 'जस्टिस फॉर काश्मीर'चे बॅनर लावलेले विमान, भारतीय संघाची सुरक्षा ऐरणीवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- आज(शनिवार) विश्वचषकात भारताचा श्रीलंकेसोबत सामना होत आहे. यावेळी एक विचीत्र दृष्य पाहायला मिळाले आहे. सामना सुरू असताना, मैदानावरून एका विमान गेले, त्याच्या मागे "जस्टीस फॉर काश्मीर"असे बॅनर लावले होते. या घटनेमुळे भारतीय संघाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.


काय आहे प्रकरण ?
क्रिकेट विश्वचषक 2019 मध्ये आज(शनिवार) भारताचा श्रीलंकेसोबत सामना होत आहे. यावेळी एक विचीत्र दृष्ट पाहायला मिळाले आहे. सामना सुरू असताना लीड्स मैदानावरून एक विमान उडाले, सुरुवातील सगळ्यांना वाटले हे इतर विमानाप्रमाणे आहे, त्यामुळे त्याच्याकडे कोणाचे जास्त लक्ष गेले नाही. पण नंतर तेच विमान परत लीड्सवरून गेले, असे तीन चार वेळेस झाले. त्यानंतर काही जणांचे लक्ष त्याकडे गेले असता, विमानाच्या मागील बाजुस एक बॅनर लावलेले दिसले. या बॅनरवर "जस्टीस फॉर काश्मीर" असे लिहीलेले होते. यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दरम्यान, लीड्सच्या मैदानावरून गेलेले विमान नेमके होते तरी कोणाचे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. स्थानीक पोलिसांनी लीड्स एअर ट्रॅफिक विभागाला याबाबत माहिती दिली आहे. 

 

 


अशाच प्रकारी घटना याच मैदानावर घडली
लीड्समध्येच 29 जूनला झालेल्या पाकिस्तान-अफगानिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये राडा झाला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामना सुरु होता, यावेळी मैदानावरून एक अनधिकृत विमान गेले. या विमानावर 'जस्टिस फॉर बलूचिस्तान' हे शब्द मोठ्या अक्षरांत लिहिले गेले होते. यामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अफगानी समर्थकांना मारहाण केली.


त्यावेळेस आयसीसीने हे अनधिकृत विमान असल्याचे सांगितले होते. त्यावेळसही लीड्सचा एअर ट्रॅफिक विभागाला याची माहिती देण्यात आली होती, पण आजही तसेच झाले. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षा ऐरणीवर आली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...