आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महशहरच्या रस्त्यावर चुकीने उतरले विमान, सर्व १३५ प्रवासी सुरक्षित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या कंपनीचे विमान आधी २००९ मध्ये कजविन शहरातही कोसळले होते

तेहरान- रहदारीच्या रस्त्यावर अचानक विमान उतरले तर..? इराणच्या महशहर येथे सोमवारी असे प्रत्यक्षात घडले. प्रवासी विमान उतरलेले पाहून परिसरातील लोक घाबरले. कारण ते कोसळले असण्याची भीती होती. परंतु विमानातील सर्व १३५ प्रवासी सुरक्षित असल्याचे कळल्यावर सर्वांना दिलासा मिळाला. 


विमान तेहरान येथून महशहरच्या दिशेने जात होते. दुर्घटनेत या डबल इंजिन विमानाची चाके तुटली. काही प्रवाशांना मुख्य दरवाजा तर काहींना इमर्जन्सी दाराकडे आणून सोडण्यात आले. आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विमानावर स्प्रेचा शिडकावा केला. रस्त्यावरील वाहतुक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली. वास्तविक हे विमानतळावरच हे विमान उतरवण्याचे प्रयत्न होते. परंतु चुकीने ते रस्त्यावर उतरवण्यात आले.

घटनांच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. विमान तेहरान कंपनी कॅस्पियन एअरलाइन्सचे होते. या कंपनीचे विमान आधी २००९ मध्ये कजविन शहरातही कोसळले होते. विमानात १६८ प्रवासी होते. त्या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ती दुर्घटनात इराणमधील सर्वात भयंकर अपघात मानली जाते. 
 

बातम्या आणखी आहेत...