वेगवेगळ्या लढाऊ विमानांचे / वेगवेगळ्या लढाऊ विमानांचे प्रशिक्षण एकाच सिम्युलेटरवर

स्पाेर्ट सुपरसाेनिक आेमिनी राेल फायटर ट्रेनरची हाेणार निर्मिती, मिराजसह विमानांचे प्रशिक्षण कॉकपीटमध्ये

मंगेश फल्ले

Mar 01,2019 02:30:00 PM IST

पुणे - भारतीय हवाई दलाकडे असलेल्या वेगवेगळ्या देशी आणि परदेशी लढाऊ विमानांचे प्रशिक्षण वैमानिकांना घेण्यासाठी संबंधित लढाऊ विमानांचे सिम्युलेटर वापरून नेमके विमान कशाप्रकारे चालवयाचे याबाबत प्रशिक्षण घ्यावे लागते.त्यादृष्टीने सुखाेई, जग्वार, मिग, मिराज अशा विविध लढाऊ विमानांचे प्रशिक्षण एकाच काॅकपीट मधील सिम्युलेटवर घेण्यासाठी बंगळूरू येथील हिंदुस्थान एराेनाॅटिक्स लिमिटेड(एचएएल) द्वारे ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित स्पाेर्ट सुपरसाेनिक आेमिनी राेल फायटर ट्रेनरची निर्मिती करण्यात येत असून पुढील तीन वर्षांत ते हवार्इ दलाच्या प्रशिक्षण केंद्रात दाखल हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


यामध्ये विमानातील नियंत्रक व्यवस्थेची याेग्यप्रकारे हाताळणी करणे, लढाऊ विमानातील आयुधांचा कुशलनेते वापर करणे, शत्रूच्या रडार, मिसाईल पासून बच करणे, आप्तकालीन परिस्थितीचा अनुभव घेणे आदी गाेष्टींचा अनुभव वैमानिकास घेता येईल. ध्वनीच्या तिप्पट वेगाने जाणारी सुपरसाेनिक विमाने चालविण्यासाठी बारकार्इने काैशल्य आत्मसात करून आत्मविश्वासाने उड्डाण करणे वैमानिकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असते. त्यादृष्टीने सुखाेई, जग्वार, मिग, मिराज अशा विविध लढाऊ विमानांचे प्रशिक्षण ग्लासच्या काॅकपीट मध्ये बसून वैमानिकांना घेता येईल. यामध्ये एक माेठया स्क्रीनवर युध्दजन्य परिस्थिती निर्माण करण्यात येते व त्याचा सामना कशाप्रकारे करायाचा याबाबत सिम्युलेटरच्या माध्यमातून तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येते. सुपरसाेनिक आेमिनी राेल फायटर ट्रेनर द्वारे सेन्साॅर व सिस्टीमची हाताळणी, व्यैक्तिक युध्द लढाई आणि समूहाच्या सहाय्याने शत्रूचा सामना करणे, हवेत मिसाईल डागणे आदी कामे होतात.


वेगवेगळया सिम्युलेटरचा खर्च वाचणार
बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित लढाऊ विमानांची निर्मिती माेठ्या प्रमाणात हाेऊ लागली आहे. त्यामुळे विविध प्रकारचे सिम्युलेटर वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरावे लागतात आणि काेट्यावधी रुपये सिम्युलेटरवर खर्च हाेतात. विविध प्रकारच्या लढाऊ विमानांसाठी एकच सिम्युलेटर बनविल्यास अनावश्यक खर्च वाचवता येऊ शकताे. वेगवेगळ्या मिशन मध्ये विविध प्रकारच्या भूमिका कशाप्रकारे पार पाडव्यात यादृष्टीने या सुपरसाेनिक सिम्युलेटरचा उपयाेग हाेणार आहे.

X
COMMENT