आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airport वरून प्रवासी विमान चोरून निघाला Airlines चा कर्मचारी, समुद्रात कोसळले; शोध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील सिएटल विमानतळावरून परवानगी न घेता एका प्रवासी विमानाने अचानक उड्डान घेतली. तेच विमान काही अंतरावर असलेल्या बेटाजवळ समुद्रात कोसळले आहे. यानंतर ते विमान चोरीला गेले होते असा खुलासा झाला. सोबतच विमान चोरणारा एका एअरलाइन्स कंपनीचा कर्मचारी होता. त्यानेच प्रवासी नसलेला विमान चोरून नेले. परंतु, सिएटलपासून अवघ्या काही अंतरावर ते विमान सागरात कोसळले आहे. स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी संध्याकाळी या विमानाने उड्डान घेतली होती. त्यामुळे सिएटलचे टकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ काही वेळ बंद ठेवावे लागले. 


पाठलाग करण्यासाठी निघाले होते 2 फायटर जेट
विमान चोरीला गेल्याचे कळताच अमेरिकेच्या हवाई दलाने त्याचा पाठलाग करण्यासाठी दोन F-15 लढाऊ विमान पाठवले. परंतु, पुगेट साउंड बेटाजवळ ते विमान कोसळले. यातील कथित चोर वैमानिकाचे नेमके काय झाले हे अद्याप कळू शकलेले नाही. पिअर्स काउंटी शेरिफने सांगितल्याप्रमाणे, हा दहशतवादी हल्ल्याचा कट नव्हता. आरोपी एक 29 वर्षीय स्थानिक आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलने वारंवार त्याला लँड होण्यासाठी प्रोत्साहित केले. मदतीचे आश्वासनही दिले. परंतु, विमान क्रॅश झाले. स्थानिकांनी त्या विमानासह त्याचा पाठलाग करणाऱ्या फायटर जेट्सचे क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले आहेत. तेच फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...