आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रह परिवर्तन : जूनमध्ये गुरु, शनी, राहू-केतू राहतील वक्री, बदलणार नाहीत राशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2019 मधील नवीन महिना जून सुरु झाला असून या महिन्यात गुरु, शनी आणि राहू-केतू व्यतिरिक्त इतर पाच ग्रह राशी बदलतील. पंचांगानुसार येथे जाणून घ्या जून 2019 मध्ये केव्हा कोणता ग्रह राशी बदलणार...


जूनमध्ये ग्रहांची स्थिती
सूर्य
- जूनच्या सुरुवातील सूर्य वृषभ राशीमध्ये आहे. 15 जूनला हा ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल.


चंद्र - 1 जूनला चंद्र मेष राशीमध्ये आहे. यानंतर 2 तारखेला वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर प्रत्येक अडीच दिवसाला चंद्र राशी बदलेल.


मंगळ - हा ग्रह सध्या मिथुन राशीमध्ये आहे. 22 जूनला मंगळ राशी बदलून कर्क राशीमध्ये प्रवेश करेल.


बुध - 1 जूनला दिवसा वृषभ राशीमध्ये राहील आणि याच दिवशी रात्री मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 20 जूनला कर्क राशीमध्ये प्रवेश करेल.


गुरु - हा ग्रह सध्या वक्री असून संपूर्ण महिना वृश्चिक राशीमध्ये राहील.


शुक्र - महिन्याच्या सुरुवातील हा ग्रह मेष राशीमध्ये आहे. 4 जूनला वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 28 जूनला शुक्राची राशी बदलून मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल.


शनी - हा ग्रह संध्यावं वक्री असून संपूर्ण महिना धनु राशीमध्ये राहील.


राहू-केतू - हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री राहतात. जूनमध्ये राहू मिथुन राशीत आणि केतू धनु राशीमध्ये शनिसोबत राहील.