ग्रह स्थिती / डिसेंबर 2019 मध्ये सूर्य 16 आणि मंगळ 25 तारखेला बदलणार राशी, 4 ग्रहांचे होणार नाही राशी परिवर्तन

वर्षातील शेवटचा महिना, केव्हा कोणता ग्रह बदलणार राशी

रिलिजन डेस्क

Dec 02,2019 12:10:00 AM IST

वर्ष 2019 मधील शेवटचा महिना डिसेंबर सुरु झाला आहे. या महिन्यात चंद्राव्यतिरिक्त सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र राशि परिवर्तन करतील. इतर चार ग्रह गुरु, शनी आणि राहू-केतू राशी बदलणार नाहीत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ग्रहांच्या परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. येथे जाणून घ्या, डिसेंबर महिन्यात कोणता ग्रह केव्हा राशी बदलणार आहे....

  • सूर्य - महिन्याच्या सुरुवातीला हा ग्रह वृश्चिक राशीमध्ये आहे आणि 16 डिसेंबरला धनु राशीमध्ये प्रवेश करेल.
  • चंद्र - 1 डिसेंबरला चंद्र मकर राशीमध्ये राहील आणि 2 तारखेला कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल.त्यानंतर प्रत्येक अडीच दिवसांनी चंद्र राशी बदलेल.
  • मंगळ - हा ग्रह तूळ राशीमध्ये आहे आणि 25 डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल.
  • बुध - तूळ राशीमध्ये आहे. 5 डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 25 डिसेंबरला धनु राशीमध्ये प्रवेश करेल.
  • गुरु - संपूर्ण महिना हा ग्रह धनु राशीमध्ये राहील.
  • शुक्र - हा ग्रह सध्या धनु राशीमध्ये आहे. 15 डिसेंबरला हा ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करेल.
  • शनि - हा ग्रह राशी बदलणार नाही आणि संपूर्ण महिना धनु राशीमध्ये राहील.
  • राहू-केतू - हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री राहतात. संपूर्ण महिना राहू मिथुनमध्ये आणि केतू धनु राशीमध्ये राहील.
X
COMMENT