आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य 18 तारखेला कन्यामधून तूळ राशीत प्रवेश करेल आणि शनी, राहू-केतू राशी बदलणार नाहीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन महिना ऑक्टोबर सुरु झाला आहे. या महिन्यात 5 ग्रह राशि परिवर्तन करतील तर 5 ग्रह आहेत त्या राशीमध्येच राहतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ग्रह परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. ग्रहांच्या शुभ-अशुभ प्रभावामुळे आपल्याला जीवनात सुख-दुःखाला सामोरे जावे लागते. पंचांगानुसार जाणून घ्या, ऑक्टोबरमध्ये कोणता ग्रह केव्हा राशि बदलणार...

सूर्य - महिन्याच्या सुरुवातीला हा ग्रह कन्या राशीमध्ये आणि 18 ऑक्टोबरला तूळ राशीमध्ये प्रवेश करेल.

चंद्र - 1 ऑक्टोबरला तूळ राशीमध्ये आणि 2 तारखेला वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर प्रत्येक अडीच दिवसांनी राशि बदलेल.

मंगळ - या महिन्यात मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राहील.

बुध - हा ग्रह सध्या तूळ राशीमध्ये आहे. 23 ऑक्टोबरला बुध वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. 31 तारखेला वक्री होईल.

गुरु - संपूर्ण महिना हा ग्रह वृश्चिक राशीमध्ये राहील.

शुक्र - हा ग्रह सध्या कन्या राशीमध्ये आहे आणि 3 ऑक्टोबरला तूळ राशीमध्ये प्रवेश करेल. 28 तारखेला वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल.

शनि - हा ग्रह राशि बदलणार नाही आणि संपूर्ण महिना धनु राशीमध्ये राहील.

राहु-केतु - हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री राहतात. संपूर्ण महिना राहू मिथुनमध्ये आणि केतू धनु राशीमध्ये राहील.

बातम्या आणखी आहेत...