Home | Maharashtra | Vidarva | Akola | planing against Raju shetty

खासदार राजू शेट्टी यांचे नरेंद्र दाभोळकर करण्याचे षडयंत्र ..

प्रतिनिधी | Update - Dec 09, 2018, 09:45 AM IST

तक्रार 'स्वाभिमानी'चे तुपकर यांचा भाजप सरकारवर आरोप

 • planing against Raju shetty


  यवतमाळ- शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शासनकर्त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. याचा राग मनात धरून राजू शेट्टी यांचेही नरेंद्र दाभोळकर करण्याचे षडयंत्र भाजप सरकारने आखल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवीकांत तुपकर यांनी केला. शनिवार, ८ डिसेंबर रोजी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदा दुष्काळ जाहिर केला, परंतु बऱ्याच तालुक्यावर शासनाने अन्याय केला आहे. दुष्काळग्रस्तांना न्याय देण्याच्या दृष्टीने येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही ते बोलताना म्हणाले.


  भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यापूर्वी विविध प्रकारचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला बळी पडून मतदारांनी भाजपाला निवडून दिले, परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी कुठल्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. मात्र, भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्म्हत्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोपही यावेळी तुपकर यांनी केला. यंदा संपूर्ण राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत शासनकर्त्यांनी दुष्काळ जाहिर करताना दुजाभाव केला आहे. दुष्काळाची दाहकता सरकारला अद्यापही कळाली नाही. अनेक तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. तर ज्या तालुक्यात दुष्काळी जाहिर केला, तिथेसुद्धा विशेष असे काहीच करण्यात आले नाही. केवळ तांत्रीक बाबींवर बोट ठेवण्यात येत आहे. दुष्काळामध्ये ५० टक्के शेतसारा माफ केल्या जातो, त्याचप्रमाणे ३३ टक्के वीज बिल माफ करण्यत येते, कर्जाचे पुर्नगठण होते. ही बाब तर प्रत्येकवेळीच केल्या जात आहे. सोबत चारा छावण्या निर्माण करण्यात येते, परंतु ह्या चारा छावण्या केवळ पैसा कमविण्याचे सत्ताधाऱ्यांचे साधन असल्याचा आरोपही यावेळी तुपकर यांनी केला. दुष्काळाच्या नियोजनात सरकार अपयशी ठरले आहे. ह्या सर्व बाबी करण्याऐवजी प्रती हेक्टर शेतकऱ्यांना ५० हजार रूपये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकरी चक्क चिठ्ठ्या लिहून आत्महत्या करीत आहे. जानेवारी महिन्यात नोकरदारांना वेतनवाढ देण्याचा निर्णय केवळ निवडणुका तोंडावर ठेवूनच जाहिर केला. शेतकऱ्यांना मदतीच्या वेळीच सरकारची तिजोरी रिकामी असल्याचे भास निर्माण करण्यात येतो. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाला अडचणीत आणले आहे. हा राग मनात धरून राजू शेट्टी यांचे नरेंद्र दाभोळकर करण्याचे षडयंत्र भाजप सरकारने आखल्याचा आरोप तुपकर यांनी केला. यावेळी संतोष परिहार, डॉ. अशोक तुपकर, नीलेश धुपे उपस्थित होते.

  बँकाचे कार्यालय उद्धवस्त करू

  दुष्काळाच्या स्थितीत कर्ज वसूली बँकांसह मायक्रो फायनांन्स, पतसंस्थांनी बंद करणे गरजेचे आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना वसूलीसाठी त्रास देणे सुरूच आहे. हा प्रकार येत्या काळात बंद न केल्यास राष्ट्रीयकृत बँक असो अथवा मध्यवर्ती, पतसंस्था तसेच मायक्रो फायनांन्सचे कार्यालय स्वाभीमानी शेतकरी संघटना उद्धस्त करेल, असेही पत्रकार परिषदेत बोलताना


  शेतकऱ्यांनी जगायचे कसे?
  वन्यप्राणी व भारनियमनामुळे शेतकऱ्यांपुढे शेती करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून, शेतकऱ्यांनी जगायचे कसे? याचे उत्तर शासनाने द्यावे, अशी आक्रमक भूमिका घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. पारवा गावात शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती व घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त शेतकरी समितीने संकटग्रस्त शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद घेत १० ठराव पारित केले.

Trending