आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या अंगावर छताचे प्लास्टर कोसळले; दाेन जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धनाथ वाडगाव- तादुंळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग इयत्ता ५ वी वर्गातील ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर बुधवारी पडला. यात अर्जुन अंगतसिंग शिहरे या विद्यार्थ्याच्या खांद्यास मुका मार लागला. तेजस गोरख राजपूतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 


काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा प्रकार घडला, असे नागरिकांसह पालकांनी सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अंभोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ जगदाळे, शिक्षक मोटे यांनी तत्काळ सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. काही दिवसांपूर्वी तादुंळवाडी येथील जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आली होती. कधी भयंकर घटना घडेल असे निवेदन यापूर्वी गावकऱ्यांनी दिले होते. म्हणून या शाळेच्या बांधकामासाठी तत्काळ २० लाख रुपये निधी जिल्हा परिषदेकडून मंजूर झाला होता. या शाळेच्या कामाचे टेंडर होऊन संबंधित ठेकेदाराने या बांधकामाचे प्लास्टर मजबूत न करता प्लास्टरसाठी मातीमिश्रित वाळू वापरून काम केल्याने बुधवारी दुपारी शाळेत मध्यंतरी भोजनाच्या वेळी काही विद्यार्थी बाहेर असल्याने स्लॅबचे प्लास्टर निखळून यात काही विद्यार्थी जखमी झाले. जे विद्यार्थी वर्गाबाहेर होते यापासून थोडक्यात बचावले आहेत. 


दैव बलवत्तर 
ही घटना दुपारच्या मध्यान्ह भोजनाच्या वेळी घडली. बाकीचे विद्यार्थी वर्गाच्या बाहेर असल्याने बचावले. माहिती मिळताच गटविकास अधिकारी विद्याधर पाटील, गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम पवार, सरपंच अजित राजपूत, मनीषा वाशिंबे यांनी भेट देत विद्यार्थ्यांची चौकशी करून घटनेचा पंचनामा केला. 

 

बातम्या आणखी आहेत...