आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची बाटली ठेवलेली असेल तर लागू शकते तुमच्या कारला आग.. अशी घ्या काळजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - आपल्यापैकी ज्यांच्याकडे कार आहे त्याच्या प्रत्येकाच्या कारमध्ये पाण्याची बाटली ही असतेच. पण पाण्याची ही बाटली कधीतरी अत्यंत घातकही ठरू शकते. या पाण्याच्या बाटलीमुळे तुमच्या कारला आग लागण्याचा धोका असतो. सर्वात आधी असे काही ऐकल्यास खोटे वाटते पण हे खरे आहे. 

 

अमेरिकेतील अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा व्यक्ती कार पार्क करून कामासाठी गेला होता. परत येऊन पाहिले तर त्याच्या कारच्या सीटमधून धूर निघत होता. त्याचे सीट जळत होता, कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला कळले की पाण्याच्या बाटलीमुळे हे झाले आहे.  


अशी लागू शकते आग 
तुमची पाण्याची बाटली कारमध्ये ठेवलेली असेल आणि तिच्यातून सूर्यकिरणे जात असतील तर हा धोका संभवतो. बाटलीमध्ये पाणी असल्यामुळे ही बाटली भिंगासारखे काम करते. ही बाटली सूर्यकिरणे एकवटून परावर्तीत करते. त्यामुळे जसे भिंग उन्हात धरून कागद पेटवण्याचा प्रयोग आपण करतो तसाच काहीसा प्रकार घडतो. या प्रकरणातही तसेच झाले. 


अशी काळजी घ्या 
कारमध्ये पाण्याची बाटली तर ठेवावीच लागेल. त्यामुळे शक्य तर स्टीलची किंवा पारदर्शक नसेल अशी पाण्याची बाटली कारमध्ये ठेवा. विकत मिळणाऱ्या मिनरल वॉटरच्या बाटल्या पारदर्शक असतात त्या ठेवू नका. त्यातील पाणी हवे तर इतर बाटल्यांत घ्या. शक्य तो समोरच्या डॅशबोर्डवर बाटली ठेवू नका. सीटच्या मागे किंवा उन्हात राहणार नाही अशा ठिकाणी बाटली ठेवा. 

बातम्या आणखी आहेत...