आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांच्या सभेत प्लास्टिक ग्लास ; १० हजारांचा दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर : प्रचारात सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले अाहेत. अकाेला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. सभेतील लाेकांना पाणी पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास वापरले गेले. त्यामुळे नगरपालिकेने सभेचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसला दहा हजार रुपयांचा दंड ठाेठावला अाहे.

९ ऑक्टोबरला शरद पवार यांची संत गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. यात सिंगल युज प्लास्टिक ग्लासचा माेठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. या सभेत अालेल्या लाेकांना प्लास्टिकच्या ग्लासमधून पिण्याचे पाणी पुरवण्यात अाले. वापरानंतर हजाराे ग्लास तिथेच मैदानावर फेकून देण्यात अाले. या प्रकरणाची दखल नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी तातडीने घेतली. आरोग्य अधिकारी विजय लकडे यांना सभेच्या आयोजकांना दहा हजार रुपयाचा दंड आकारण्याची सूचना केली.

आम्ही शासनाच्या आदेशाचे पालन केले
आमची कारवाई थांबणार नाही. पर्यावरणाला कोणतेही नुकसान होऊ नये, याची काळजी घेऊन आम्ही शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत आहोत. शहरातील नागरिकांनी, राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अजिबात प्लास्टिकचा वापर करू नये, अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करून दंड आकारू. -विजय लोहकरे, मुख्याधिकारी, नगरपालिका.
 

बातम्या आणखी आहेत...