आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंनो, दिवसातून दहा ते बारा वेळा आहार घ्या; आठ-दहा लिटर पाणी प्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दिवसातून थोडा थोडा असा दहा ते बारावेळा आहार घ्या, कमीत कमी आठ ते दहा लिटर पाणी प्या. यामुळे स्नायूतील दुखापत कमी होते, असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय आहारतज्ज्ञ अपूर्वा कुंभकोणी यांनी दिला. खेळाडूंना मोकळेपणे जाण्यासाठी स्वच्छतागृहे स्वच्छ हवीत. घाण स्वच्छतागृह टाळण्यासाठी खेळाडू पाणी कमी पितात व त्याचा परिणाम कामगिरीवर होतो, असा इशारा देत याकामी लोकप्रतिनिधी अथवा उद्योगपतींना यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 


डायटमध्ये 'रेस्ट डे' नाही 
कामगिरी सुधारण्यासाठी डायटमध्ये 'रेस्ट डे' नाही. सहलीला गेला तरीही. स्पर्धेपूर्वी, स्पर्धेवेळी व स्पर्धेनंतर जो आहार घेणार आहे त्या डायटचा आकार ठरवा. तो शरीरास सूट होतो की नाही यासाठी सराव करताना याचा प्रयोग करा. प्रवासातला आहारही ठरवा. सांघिक कामगिरीसाठी एकत्र आहार घ्या. ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी आहारच्या स्टॉलमध्ये ५२ प्रकारचे ब्रेड असतात. त्यामुळे ब्रेड खाण्याची सवय ठेवा. सरावानंतर ३० मिनिटांनंतर आहार घेतल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या िदवशी होतो. 


काय करावे : कमीत कमीत ३ ते ४ केळी खा. दूध, ताक, कडी, ज्यूस प्या. फळे, पालेभाज्या व मांसाहारी असाल तर अंडी व मासे खा. स्पर्धा नसताना धान्याचे प्रमाण एक चतुर्थांश. स्पर्धा जवळ आल्यावर हेच प्रमाण फळांचे. पाणी असलेली फळे खा. स्पर्धेपूर्वी तीन तासांपूर्वी मोठा आहार, एक तासापूर्वी छोटा आहार घ्या. भाकरी ऐवजी पोळीला पसंती द्या. पांढरा भात खा. स्पर्धेच्या वेळी ब्रेक मिळाला तर हलका आहार घ्या. ६० मिनिटांपेक्षा जास्त सराव असल्यास आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने स्पोर्टस् ड्रिंक व फूड घ्या. सरावानंतर किंवा स्पर्धा संपल्यानंतर अर्धा तासापूर्वी आहार घ्या. पुस्तके, वृत्तपत्रे, खेळाडूंची मुलाखत, खेळाडूंची आत्मचरित्रे वाचा. मग ती कोणत्याही खेळातील असो. 


काय टाळावे : जास्त शारीरिक मेहनत. इंटरनेटनरील डायट तुमच्या शरीरास फीट नसतो. तो व मोफत सल्ला डायट टाळा. मटन खाणे. आहारशिवाय स्पर्धेतील सहभाग. चुकीचा आहार. उघड्यावर असलेले आहार. 

बातम्या आणखी आहेत...