आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावपटू संजीवनी जाधवसह खेळाडू उत्तेजक पदार्थ सेवन चाचणीत दोषी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे पाच भारतीय अॅथलिटक्स‌् उत्तेजक पदार्थ चाचणीत दोषी आढळले आहेत. यात नाशिकच्या संजीवनी जाधव हिचादेखील समावेश असल्याचे वृत्त आहेे. जागतिक अमली पदार्थविरोधी संस्थेने (वाडा) घेतलेल्या या चाचणीत जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत सहभागी निर्मला शेराॅन, थाळीफेकपटू संदीपाकुमारी, जुम्मा खातून, गोळाफेकपटू नवीन हेही दोषी आढळले आहेत.  


‘वाडा’ने आशियाई स्पर्धेपूर्वी  गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य निवड चाचणीदरम्यान घेतलेल्या उत्तेजक द्रव चाचणीचे निष्कर्ष सोमवारी जाहीर केले. हे निष्कर्ष उशिरा जाहीर करण्यात आल्याने या खेळांडूना आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी होता आले होते. अॅथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडियाने अद्यापपर्यंत या खेळाडूंना राष्ट्रीय सराव प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यास बंदी घातलेली नाही. यापूर्वी अचानक घेतल्या गेलेल्या उत्तेजक द्रव चाचणीमध्ये हे खेळाडू दोषी आढळून आले नव्हते. या खेळांडूनी राष्ट्रीय प्रशिक्षकासह खासगी प्रशिक्षकांकडूनही प्रशिक्षण घेतल्याची बाबही समोर येत आहे. जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय अॅथलिट संजीवनी ६९ पदकांची कमाई केली होती. ही भारतीय चमूूची सर्वात मोठी कामगिरी होती. त्यात धावपटूंच्या सात सुवर्णपदकांसह १९ पदकांचा समावेश होता. उत्तेजक द्रव सेवनाच्या घटनांत भारतीय खेळाडूंचे प्रमाण कमी झाल्याचा दावा नाडाने केला होता. मात्र, नुकत्याच प्राप्त झालेल्या या अहवालामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. 
एका स्पर्धेनिमित्त सध्या मी बाहेरगावी आहे. बुधवारी नाशिकला पोहाेचल्यानंतर संजीवनी जाधव हिच्यासेाबत याबाबत बोलणार आहे. अशावेळी संजीवनी जाधव हिच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया संजीवनीचे प्रशिक्षक  वीजेंद्र सिंग यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...