आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत नळजाेडणी कामास विराेध केला म्हणून, बाेगस प्लंबरकडून मनपा अभियंत्यावर तलवारीने वार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मालेगाव- अनधिकृत नळजाेडणी कामास विराेध केला म्हणून एका खासगी प्लंबरने महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता माेहम्मद बद्रुद्दाेजा अन्सारी यांच्यावर रविवारी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात अभियंत्याच्या डाेक्यास ९ इंचाची जखम हाेऊन कवटी फुटून हाड मेंदूत घुसले आहे.  जखमी अन्सारींवर नाशिकला तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साेमवारी सकाळी कामबंद आंदाेलन करत घटनेचा निषेध केला.   तर हल्लेखाेरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाखा अभियंता अन्सारी यांच्याकडे प्रभाग क्र. ३ व ४ ची जबाबदारी आहे. रविवारी दुपारी जाफरनगर भागातून जात असताना खासगी प्लंबर व्यावसायिक रफिक मन्सुरी बेकायदा नळजाेडणीचे काम करत हाेता. अन्सारी यांनी नळजाेडणीच्या कामास विराेध करत काम बंद करण्यास सांगितले. मात्र, रफिक सायंकाळी पुन्हा नळजाेडणीचे काम करताना दिसला.  या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्याने अन्सारींवर हल्ला केला.

 

बातम्या आणखी आहेत...