आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांचा जपान दाैरा: अमेरिका-इराणमधील तणाव नष्ट करण्याचे प्रयत्न - पंतप्रधान अॅबे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाेकियाे - इराण व अन्य सहा जागतिक शक्तींसाेबतच्या अणुकरारातून अमेरिकेने स्वत:ला वेगळे केल्यानंतर दाेन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या लष्करी संघर्षाच्या स्थितीत आपण शक्य ते सर्व प्रयत्न करू, असे जपानने म्हटले आहे. त्याआधी जपानचे पंतप्रधान शिंजाे अॅबे यांची अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यासाेबत बैठक झाली. यादरम्यान दाेन्ही देशांनी विविध द्विपक्षीय मुद्दे व इराणच्या स्थितीसह अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली. ट्रम्प शनिवारी जपानच्या चार दिवसांच्या दाैऱ्यावर आले आहेत. अॅबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जपान, अमेरिका व संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी पश्चिम आशियात शांतता व स्थैर्य खूप महत्त्वाचे आहे. जपान अमेरिकेसाेबत काम करून इराणवरून निर्माण झालेला तणाव नष्ट करेल आणि लष्करी संघर्षाची स्थिती दूर करण्याच्या दिशेने प्रत्येक पाऊल उचलेल. या महिन्याच्या सुरुवातीस प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार अमेरिका व इराणमधील तणाव कमी करण्यासाठी अॅबे १२-१४ जून राेजी इराणच्या दाैऱ्यावर जाणार असल्याचे नमूद केले हाेते. अॅबे यांनी या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जाॅन बाेल्टन यांच्याशी कथितरीत्या चर्चाही केली हाेती. जपानच्या विदेश मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने गेल्या बुधवारी याला दुजाेरा देण्यास नकार दिला हाेता. सूत्रांनुसार, अॅबे यांची गेल्या वर्षी उन्हाळ्यात इराणला जाण्याची याेजना हाेती. मात्र, यादरम्यान अमेरिका अणुकरारातून बाहेर पडला आणि दाेन्ही देशांतील संबंधात माेठा तणाव निर्माण झाला. अमेरिका अणुकरारातून बाहेर पडला तरी हा करार लागू करणे सर्व पक्षांना आवश्यक असल्याचे जपानला वाटते. अमेरिका गेल्या वर्षी या करारातून बाहेर पडला.

 
काेरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीची चिंता नाही 
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर काेरियाने नुकत्याच घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांबाबत जपानचे पंतप्रधान शिंजाे अॅबे यांच्याशी असहमती व्यक्त केली. आपण या चाचण्यांबाबत चिंतित नसल्याचे त्यांनी येथे सांगितले. उत्तर काेरियाने मे महिन्याच्या सुरुवातीस कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली हाेती. दाेन्ही नेत्यांमध्ये अनेक तास चाललेल्या चर्चेनंतर अॅबे व ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन केल्याबाबत अॅबे यांनी या वेळी असहमती दर्शवली. ट्रम्प यांच्याशी अनेक मुद्द्यांवर मतैक्य असणारे अॅबे यांची चिंता वाढण्याचे कारण म्हणजे, हे क्षेपणास्त्र जपानच्या सुरक्षेसाठी धाेकादायक आहे. अॅबे यांनी उत्तर काेरियाचे नेते किम जाेंग उनसाेबत प्रस्तावित बैठकीबाबत सांगितले की, त्यांना याबाबत ट्रम्प यांचा पाठिंबा मिळाला आहे. टाेकियाेतील शिखर परिषदेनंतर त्यांनी सांगितले की, मला वाटते की, मला चेअरमन किमसाेबत पूर्वअटीसाेबत समाेरासमाेर चर्चा केली पाहिजे.

 

२०१५ मध्ये झाला हाेता इराणसाेबत करार
हा करार २०१५ मध्ये इराण व सहा जागतिक शक्तींसाेबत झाला हाेता. त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया व इराणचा समावेश हाेता. या कराराअंतर्गत इराणवर अणु कार्यक्रम बंद केल्याच्या बदल्यात निर्बंध उठवण्याची अट घातली हाेती. हा करार तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या कार्यकाळात झाला हाेता. मात्र, ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेला यापासून विभक्त केले आणि इराणवर पुन्हा निर्बंध लादले.
 

बातम्या आणखी आहेत...