आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ब्रह्मपुत्रेवरील डबल डेकर पुलाचे उद्घाटन, आणीबाणीच्या स्थितीत लष्कराचे टँकही जाऊ शकणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिब्रूगड - आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांना जोडणाऱ्या डबल डेकर पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. या पुलामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा मार्ग खुला झाल्याने या भागातील लोकांचे अनेक वर्षांचे जुने स्वप्न पूर्ण झाले आहे. 

#WATCH Prime Minister Narendra Modi at Bogibeel Bridge, a combined rail and road bridge over Brahmaputra river in Dibrugarh. #Assam pic.twitter.com/LiTR9jO5ks

— ANI (@ANI) December 25, 2018
नाताळाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाचे लोकार्पण केले आहे. रेल्वेमार्ग आणि वाहनांचा मार्ग अशा या डबल डेकर पुलामुळे ईशान्येला तैनात असलेल्या लष्करालाही मोठी मदत होणार आहे. या पुलाच्या कामाची सुरुवात 1997 मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्यावेळी झाली होती. जवळपास पाच किलोमीटर लांबी असलेला हा पूल देशातील आजवरचा सर्वात लांब रेल्वे पूल आहे. 

 

>> ब्रह्मपुत्र नदीच्या दोन टोकांना जोडणारा हा पूल तयार करणे हे मोठे आव्हान होते. 
>> या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो, तसेच भूकंपाची शक्यताही जास्त असते. पण हा पूल 8 रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाचा धक्का सहन करू शकतो. 
>> हा देशातील सर्वात मोठा पूल आहे. भारतीय रेल्वेने हा डबल डेकर पूल तयार केला आहे. याच्या खालच्या डेकवर दोन रेल्वे मार्ग आहेत. तर वरच्या डेकवर तीन लेनचा वाहतुकीचा मार्ग आहे. 
>> हा पूल उत्तरेला धेमाजी आणि दक्षिणेत डिब्रूगडला जोडणारा आहे. 
>> पूर्वी धेमाजीहून डिब्रूगड पर्यंत 500 किमीचे अंतर कापण्यासाठी 34 तास लागायचे. आता हा प्रवास केवळ 10 किमीचा असेल आणि तोही 3 तासांत पू्ण होईल. 
>> या पुलावरून लष्कराचे टॅकही नेता येणार आहे. आणीबाणीच्या स्थितीत हा पूल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 
>> पूर्वी भारतीय लष्कराला भारत-चीन सीमेवर जाण्यासाठी नदीच्या दुसऱ्या बाजुला जाण्यासाठी अनेक तासांचा रस्ता ओलांडून जावे लागत होते. 

बातम्या आणखी आहेत...