आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Asks Protesters To Agitate Against Persecution Of Minorities In Pakistan At Karnataka Visit News And Updates

मोदी म्हणाले- तुम्हाला आंदोलन करायचेच असेल तर पाकमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारविरुद्ध करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना पीएम नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दांत खडसावले आहे. मोदी म्हणाले- "तुम्हाला घोषणा द्यायच्याच असतील तर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारावर द्या. मोर्चे काढायचे असतील तर पाकिस्तानमध्ये हिंदू-दलित-वंचितांच्या समर्थनात काढा." पंतप्रधान येथील तुमकूरच्या श्री सिद्धगंगा मठाच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. याचवेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोदींनी विरोधकांवर घणाघात केला.

पाकिस्तानच्या कारस्थानांविरुद्ध आंदोलने करा -मोदी

  • किसान सन्मान योजनेचा तिसरा हप्ता गुरुवारी देण्यात आला. त्यावर बोलताना मोदी म्हणाले- “देशात एक असाही काळ होता जेव्हा गरीबांसाठी 1 रुपया पाठवला तर त्या गरीबाच्या खिशापर्यंत फक्त 15 पैसे पोहचत होते. उर्वरीत 85 पैसे हे मध्यस्थ खात होते. आज 'पंतप्रधान किसान योजना' अंतर्गत देशातील 6 कोटी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यांमध्ये 12 हजार कोटी रुपये जात आहेत."
  • यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पुरस्कार देखील प्रदान केले. मोदींनी सांगितले, "कृषी कर्मण अवार्डसह आज कर्नाटकची ही जमीन आणख एका यशाची साक्षीदार बनली आहे. आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधि अंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले."
  • "आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताच्या मसाले उत्पादन आणि निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. भारतात मसाल्यांचे उत्पादन 25 लाख टनपेक्षा अधिक वाढले आहे. यासह निर्यात सुद्धा वाढून 15 हजार कोटी रुपयांचे 19 हजार कोटींवर गेले आहे."
  • "आज जे कुणी भारताच्या संसदेच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पाकिस्तानच्या हालचाली सर्वांसमोर आणायला हव्या. तुम्हाला आंदोलन करायचेच असेल तर गेल्या 70 वर्षांपासून पाकिस्तानच्या कुकर्मांविरुद्ध आंदोलन करा."
बातम्या आणखी आहेत...