आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Modi Attacked Congress Over Farmer Loan Waiver Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी म्हणाले, काँग्रेसने आधी शेतकऱ्यांना कर्ज घ्यायला भाग पाडले आणि आता कर्जमाफीच्या नावाने दिशाभूल सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी म्हणाले, काँग्रेसने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. कर्जमाफी प्रकरणातही तेच सुरू आहे. 
  • पंतप्रधान म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांना शक्तीशाली बनवू इच्छित आहे. 

मेदिनीनगर (झारखंड) - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी पलामूमध्ये काँग्रेस शेतकरी विरोधी असल्याची टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस कर्जमाफीच्या आश्वासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना पूर्ण केल्या असत्या तर शेतकऱ्यांना कर्ज घ्यावेच लागले नसते. आधी काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्ज घ्यायला लावले आणि आता कर्जमाफीच्या नावखाली दिशाभूल केली जात आहे. काँग्रेसने नुकतीच मध्यप्रदेश, छतीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकल्या आहेत. या तीनही ठिकाणी आधी भाजपची सत्ता होती. 

 
मोदी म्हणाले, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शेतकऱ्यांना अधिक शक्तीशाली बनवण्याच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करत आहोत. आम्ही शेतकरी आणि देशसेवेला धर्म समजून काम करत आहोत. शेतीपासून ते बाजारापर्यंत एक नवी यंत्रणा उभी करून शेतकऱ्यांना सशक्त करत आहोत. यापूर्वी पंतप्रधानांनी पलामूमध्ये  3682.06 कोटींच्या 6 योजनांची पायाभरणी केली.

 
काँग्रेससाठी शेतकरी फक्त बोटबँक 
>> काँग्रेससाठी शेतकरी म्हणजे फक्त वोटबँक आहे. पण आमच्यासाठी शेतकरी अन्नदाता आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये हाच फरक आहे. 
>> 25 वर्षांपासून योजनेचे काम रखडले होते. तुम्हीच सांगा एखाज्या योजनेला एवढी वर्षे लागायला हवी का. 
>> दुष्काळी भागातील शेतकऱ्यांप्रतिचा हा निष्काळजीपणा आहे. 30 कोटींपासून सुरू झालेल्या प्रकल्पाला आता 2 हजार कोटींपेक्षा जास्त पैसा लागेल. त्याचे ओझे करदात्यांवर पडेल. यासाठी पूर्वीचे सरकार जबाबदार आहे.  
>> आमच्या सरकारमद्ये दलालांना स्थान नाही. आम्ही थेट लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा करून पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे काम करत आहोत. 
>> आधीच्या फक्त नावाला चालणाऱ्या योजना प्रत्यक्षात दिसत नाही. आमचे सरकार नावासाठी भांडण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रीत करते. 
>> देशात रिमोटचे सरकार होते तेव्हा 5 वर्षांत फक्त 25 लाख घरे बनली. आम्ही 5 वर्षांपेक्षा कमी वेळेत 1 कोटी 25 लाख घरे तयार केली आहेत. 
>> आधी जी घरे मिळायची त्यात फक्त चार भींती असायच्या. पण आता जी घरे मिळत आहेत त्यात पायाभूत सुविधाही आहेत.