आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरदासपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंजाबच्या जालंधरमध्ये भारतीय विज्ञान कांग्रेसचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. संपूर्ण देशाने काँग्रेसपासून सतर्क राहण्याची गरज असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. काँग्रेसने राज्याच्या सुरक्षेचाही विचार केला नाही असा आरोपही मोदींनी लगावला. तसेच कमलनाथ यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका केली. ज्यांच्यावर दंगलीचा आरोप आहे, अशांना मुख्यमंत्रीपदाची भेट दिली जात आहे. त्यांच्यापासून संपूर्ण पंजाब आणि देशाने सतर्क राहण्याची गरज असल्याचेही मोदी म्हणाले.
काय म्हणाले नरेंद्र मोदी...
>> काँग्रेसने देशाला आधी गरीबी हटाओच्या नाऱ्यासह देशाला ठगले आणि आता कर्जमाफीच्या नावावर देशाला ठगत आहेत.
>> एका कुटुंबाच्या इशाऱ्यावर ज्या ज्या आरोपींनी 'सज्जन' म्हणून फाइल बंद करण्यात आली त्यांना एनडीए सरकारने बाहेर काढले. एसआयटी स्थापन केली आणि त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे.
>> ज्यांचा इतिहास हजारो शीख भावंडांना निर्घृणपणे मारण्याचा राहिलेला आहे आणि ज्यांच्यावर आजही दंगलींचा आरोप आहे, त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस दिले जात आहे. अशा लोकांपासून देशाने सतर्क राहणे गरजेचे आहे.
>> नेते फक्त राजकारणासाठी पाकिस्तानला संधी देत आहेत. ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.