आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टात राम मंदिराचा खटला काँग्रेसमुळेच लांबला; न्यायमूर्तींना महाभियोगाची भीती दाखवल्याचा पंतप्रधानांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राम मंदिराच्या मुद्द्यावर विरोधकांपासून सहकारी पक्षांच्या निशाण्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच आरोप काँग्रेसवर लावून हात झटकले आहेत. सुप्रीम कोर्टात राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळेच अधांतरी अडकला आहे. काँग्रेसने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना महाभियोग आणण्याच्या धमक्या देऊन भीती दाखवली असा खळबळजनक आरोप पीएम मोदींनी लावला आहे. एवढेच नव्हे, तर काँग्रेसचे राज्यसभा खासदारच सुप्रीम कोर्टात राम मंदिराच्या बांधकाम विरोधात याचिका दाखल करतात असा दावा पंतप्रधानांनी राजस्थानात बोलताना केला आहे. पीएम मोदींनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात अलवर येथून केली. याच प्रचारसभेत बोलताना त्यांनी राम मंदिराच्या बांधकामास होणाऱ्या विलंबासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

 

आणखी काय म्हणाले मोदी...

पीएम मोदी यांनी सुप्रीम कोर्टात राम मंदिराची सुनावणी लांबण्यासाठी थेट काँग्रेसला जबाबदार धरले. "अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. परंतु, काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील सदस्यच म्हणतात, की या प्रकरणाची सुनावणी 2019 पूर्वी होऊ देऊ नका. 2019 च्या निवडणुकांपर्यंत हा मुद्दा असाच लटकून ठेवा. देशातील न्यायपालिकेत राजकारण आणणे योग्य आहे का?" पंतप्रधान पुढे म्हणाले, "काँग्रेसकडे निवडणुकीत प्रचारासाठी मुद्दा उरलेला नाही. या पक्षाचे नेते माझ्या आईसंदर्भातही शिवराळ भाषा वापरतात. कधी-कधी तर माझी जात विचारतात. साऱ्या देशाला माहिती आहे की हे सर्वस्व राहुल गांधीच्या सांगण्यावरून केले जात आहे."

बातम्या आणखी आहेत...