Home | National | Delhi | Pm Modi Campaign MainBhiChowkidar, Who so ever Is Fighting against Corruption is a Chowkidar

आता मैं भी चौकीदार! लोकसभेच्या प्रचारात मोदींचे नवे घोषवाक्य; म्हणाले, भ्रष्टाचारविरुद्ध लढणारा प्रत्येक जण चौकीदार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 12:56 PM IST

2014 च्या निवडणुकीत अच्छे दिन, 2019 मध्ये मै भी चौकीदार!

  • Pm Modi Campaign MainBhiChowkidar, Who so ever Is Fighting against Corruption is a Chowkidar

    नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणुकीत 'अच्छे दिन जरूर आयेंगे' हे घोषवाक्य लोक अजुनही विसरलेले नाहीत. त्यांच्या विरोधकांना सुद्धा भाजपवर टीका करताना हे वाक्य पाठ झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी आता 'मैं भी चौकीदार' हे नवे घोषवाक्य दिले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ जारी केला. त्यामध्येच त्यांनी 'मैं भी चौकीदार' ही मोहिम सुरू केली आहे. व्हिडिओमध्ये केंद्र सरकारची उज्ज्वला योजना, भ्रष्टाचारावर अंकुश, हायवे निर्मिती आणि देशाच्या संरक्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडिओच्या शेवटी 31 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदींशी जुडण्याचे अपील करण्यात आले आहे. जो कुणी भ्रष्टाचार आणि कचराविरुद्ध लढेल तो प्रत्येक जण चौकीदार आहे असे मोदी म्हणाले आहेत.

Trending