आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयींच्या निधनाने मी शून्यात, परंतु भावना उफाळून येत आहेत, PM मोदींची भावूक प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने मी शून्यात गेलो अशी भावूक प्रतिक्रिया पीएम मोदींनी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मी शून्यात गेलो. परंतु, भावना उफाळून येत आहेत. आपले सर्वांचे लाडके वाजपेयी या जगात नाहीत. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण देशाला समर्पित केला. त्यांचे जाणे एका युगाचा अंत आहे. असेही मोदी म्हणाले आहेत. वाजपेयींनी वयाच्या 94 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या 9 वर्षांपासून आजारी होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली होती. 

 

मोदींनी आपल्या भावना व्यक्त करताना अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या चारोळी सुद्धा ट्वीट केल्या आहेत.

 

लेकिन वो हमें कहकर गए हैं-
“मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं
मैं जी भर जिया, मैं मन से मरूं,
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूं?”

— Narendra Modi (@narendramodi) 16 August 2018
 
- मोदी पुढे म्हणाले, की अटलजी आज आपल्यात नाहीत. परंतु, त्यांनी दिलेली प्रेरणा, मार्गदर्शन नेहमीच प्रत्येक भारतीय आणि प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी मिळत राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती आणि त्यांच्या जाण्याने सर्वांना झालेले दुख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती!
- ते अटलजींचे नेतृत्वच होते, ज्यांनी शक्तीशाली, उन्नत आणि सर्वसमावेशक अशा 21 व्या शतकातील भारताचा पाया रोवला. त्यांच्या दूरदृष्टी धोरणे प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक भारतीय नागरिक अनुभवू शकतो. अटलजींचे जाणे माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणा होते. त्यांच्यासोबत अनेक सुखद आठवणी आहेत. ते सदैव आमच्या स्मरणात राहतील.
बातम्या आणखी आहेत...