पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शक्तीप्रदर्शनासह वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल: 7 घटक पक्ष प्रमुखांची उपस्थिती

दिव्य मराठी

Apr 26,2019 12:09:00 PM IST

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखर केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी बूथ अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले. ते म्हणाल की, मोदीचा बहुमताने विजय होवो अथवा न होवो पण लोकशाहीचा विजय झाला पाहिजे.


जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापूर्वी मोदींनी काळभैरव मंदिरात पूजा केली होती. मोदींच्या नामांकन भरतेवेळी एनडीएचे शक्ती प्रदर्शन दिसून आले. यावेळे बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू नेता नितीश कुमार. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अकाली दलाचे प्रकाश सिंह बादल आणि सुखवीर बादल, अन्नाद्रमुकच नेता ओ पन्नीरसेल्वम आणि थम्बीदुरई. लोजपा प्रमुख रामविलास पासवान आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो आदींनी वाराणसीत हजेरी लावली. यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सर्व घटक पक्ष नेत्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपाकडून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री राजनाथ सिंह, रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची उपस्थिती होती.

X