Home | News | Pm modi film trailer hide from youtube

संपतच नाहीयेत 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटावरील संकटे, आता यू-ट्यूबवरूनही गायब झाला फिल्मचा ट्रेलर

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 12:00 PM IST

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला फिल्म पाहायला सांगितले... 

  • Pm modi film trailer hide from youtube

    मुंबई : विवेक ओबेरॉय स्टारर बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटावरील संकटनाचे वादळ एकही केल्या कमी होत नाहीयेत. एकीकडे जिथे फिल्मची रिलीज डेट पुढे ढकलली गेली तर दुसरीकडे आता फिल्मचा ट्रेलरही यू-ट्यूबवरून गायब झाला आहे. जेव्हा गूगलवर ट्रेलर सर्च करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा ब्लॅक स्क्रीनवर एक मॅसेज आला, ज्यांमध्ये लिहिले होते, "हा व्हिडीओ उपलब्ध नाही." असा अंदाज लावला जातो आहे की, मेकर्सने फिल्मचा ट्रेलर यू-ट्यूबवरून काढून टाकला आहे.

    निवडणूक आयोगाच्या आदेशामुळेच ट्रेलर हटवावा लागला का...
    - निवडणूक आयोगाने फिल्मच्या रिलीजवर 23 मेपर्यंत रोख लावली आहे. शक्यता आहे की, यासंदर्भात असाही एखादा आदेश दिला गेला असावा की, कोणतेही पोस्टर किंवा असे काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दाखवले जाऊ नये, जे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कँडिडेटचा प्रचार करणारे असेल. ट्रेलर यू-ट्यूबवर असण्यामुळे याला आचार संहितेच भंग मानले जात असावे.
    - ही 11 एप्रिलला रिलीज होणार होती, पण निवडणूक आयोगाने याला आदर्श आचार संहितेचे उल्लंघन मानून त्यावर रोख लावली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात प्रोड्यूसर संदीप सिंहने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली, ज्याच्या उत्तरामध्ये कोर्टाने आयोगाला फिल्म पाहून 22 एप्रिलच्या सुनावणीमध्ये आपले मत मांडण्याचे आदेश दिले आहेत.

Trending